श्री स्वामी विवेकानंद स्कूल मुरगुड. वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
---------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
येथे झालेला वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. प्रशालेचे मुख्याध्यापक एन जी सावंत प्रास्ताविकात म्हणाले की, आतापर्यंत जवाहर नवोदय विद्यालय साठी 191 विद्यार्थ्यांची निवड तसेच 145 विद्यार्थी स्कॉलरशिप जिल्हा यादीत व 31 विद्यार्थी राज्य यादीमध्ये चमकले तसेच यावर्षी एन एम एम एस परीक्षे मध्ये 31 पैकी 31 मुलं यशस्वी झालेत.इंटरनॅशनल
ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये एकूण 57 मेडल मिळवून महाराष्ट्रात शाळेचे नावलौकिक झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित कुमारी जानवी जगदीश सावर्डेकर यांची रेल्वे मध्ये क्लास टू ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच कुमारी जानवी सावडेकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळेला त्या म्हणाल्या की खेळ , आरोग्य ,बुद्धी , क्षमता याची जोड असेल तर जीवनामध्ये कोणतेही काम आपण यशस्वीरित्या पार करू शकतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक एन जी सावंत प्रमुख पाहुणे जानवी सावर्डेकर तसेच आर डी मोरे , बाळकृष्ण कुलकर्णी, अशोक शिंदे, सरोजनी सावंत उपस्थित होते . सुंदर नृत्य, नाटक, गायन यांच्या सादरीकरणाने सर्व विद्यार्थ्यांनी पालकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील सर तर आभार प्रदर्शन बाजीराव गोते सर यांनी केले.
0 Comments