Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्हा संत्रा उत्पादक संघाच्या वतीने थेट संत्रा विक्री उपक्रम.

 वाशिम जिल्हा संत्रा उत्पादक संघाच्या वतीने थेट संत्रा विक्री उपक्रम.

------------------------------

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

--------------------------------

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत मागील ६-७ वर्षापासून उद्यानविद्या विभागा द्वारे विविध उपक्रमाच्या माध्यमातून शेतकाऱ्याना संत्रा लागवडीपासून ते काढणी पर्यंत जिल्ह्यातील शेतकाऱ्याना तांत्रिक पाठबळ उपलब्ध करून दिले आणि परिणामता जिल्ह्यातील संत्रा बागांमध्ये मृग बहाराची फळे मोठ्या डोलाने बागेत पोसत होती. परंतु मागील पंचवीस वर्षात विक्री व बाजारपेठेतील कधी नव्हे ती सर्वात मोठी घसरण या वर्षी शेतकऱ्यांच्या पदरात पडली आणि संत्रा उत्पादकांच्या संपूर्ण आशा मावळल्या. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली

उद्यानविद्या तज्ञ निवृत्ती पाटील यांनी संत्रा उत्पादकाना तांत्रिक सेवे सोबतच संघटन महत्वाचे आहे ही बाब लक्षात घेऊन वाशिम जिल्हा संत्रा उत्पादक संघ व नवचैतन्य कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली आणि या माध्यमातून वाशिम ऑरेंज (WAO) या नावाने संत्र्याचा ब्रॅंड सुद्धा तयार केला आणि ह्याच पूर्व तयारी चे रूपांतर करून अडचणीत असलेल्या संत्रा उत्पादकाच्या माध्यमातून उत्पादक ते ग्राहक ह्या संकल्पनेतून थेट संत्रा विक्रीची सुरवात दिनांक ५ मार्च रोजी केली. 

सुरवातीला रिसोड येथील ग्राहकांपर्यंत यशस्वी विक्री नंतर वाशिम, अकोला, हैद्राबाद इत्यादि ठिकाणी थेट विक्री करण्यात येऊन आता पर्यंत ५२ क्विंटल थेट विक्रीतून दोन ते अडीच लाख रुपये मिळाले. ज्या संत्र्याला व्यापारी १० रु प्रती किलो घ्यायला तयार नव्हते त्या संत्र्याला ३० ते ५० रु प्रती किलो चा दर मिळाला आणि संघातील १५ ते २० संत्रा उत्पादकाणा विक्री व्यवस्थापणाचे धडे शिकण्यास मिळाले.    

रिसोड येथील थेट विक्री कार्याचा शुभारंभ केव्हीके चे अध्यक्ष मा. श्री अनंतराव देशमुख यांच्या हस्ते थेट विक्रीची सुरवात करण्यात आली व बूकिंग केलेल्या ग्राहकांना घरपोच सुविधा देऊन विक्री केली.  

अकोला येथील थेट विक्रीच्या कार्याचा शुभारंभ माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. विलास खर्चे संशोधन संचालक, डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक, विस्तार, डॉ. एस. एस. माने, डॉ. प्रदीप नागरे, श्री सुधीर राठोड, कुलसचिव, श्री पाटील, नियंत्रक, सौ रजनी लोणारे, विद्यापीठ अभियंता, डॉ. नितीन कोष्टी, डॉ. मुरलीधर इंगळे, प्रकल्प संचालक, आत्मा आणि निवृत्ती पाटील, केव्हीके वाशिम यांच्या उपस्थितीत पार पडला.  

वाशिम येथे मा. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या संकल्पनेतून आत्मा कार्यालयाच्या वतीने आयोजित थेट संत्रा विक्री उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा संघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली.

सदर उपक्रमामध्ये वाशिम जिल्हा संत्रा उत्पादक संघ च्या वतीने दीपक इडोळे, रवी इडोळे, राजकुमार देव्हळे, पंढरी जाधव, योगेश खानझोडे, पंकज करडे, मोबिन शाहा, कृष्णा मानवतकर, यांसीन शाहा, गोविंद देशमुख, गोपाल म्हातारमारे, अजय बोरकर, विठ्ठल जाधव, प्रवीण ठाकरे, दीपक कुटे, संजय राऊत इत्यादी संत्रा उत्पादक शेतकाऱ्यानी सक्रिय सहभाग नोंदवीत असून थेट विक्री पुढेही अशीच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments