खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान मधून मारण्याची धमकी; रवी राणाचा ओवेसीवर गंभीर आरोप.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी एन देशमुख.
-----------------------------------------
अमरावती.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी धमकी पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानातून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचे गंभीर्य पाहता पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. दरम्यान आमदार रवी राणा यांनी या धमकी प्रकरणाची तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकाकडे केली असल्याची माहिती दिली. एम आय एमचे प्रमुख खासदार असुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच नवनीत राणा यांना धमकी आल्याचे दावा देखील आमदार रवी राणा यांनी केला आहे. अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा या आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला समोर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसात त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे आगामी काळात या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नवनीत राणा लोकसभा निवडणुकीला समोर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यादरम्यान आता नवनीत राणा यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून देण्यात आली आहे. याआदी देखील खासदार नवनीत राणा यांना अशा पद्धतीने व्हाट्सअप वर धमकी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दरम्यान आता नवनीत राणा यांना पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मधून केली आहे या प्रकरणी गंभीर्य लक्षात एम आय एम चे प्रमुख असुद्दिन ओवेसी यांच्यावर आमदार रवी राणा यांचा आरोप आहे. याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवशी खासदार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे. खासदार नवनीत राणा या संसदेमध्ये कायमच हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहे. त्यामुळे त्यांना धमकी देण्यात येत असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. याप्रकरणी खासदार ओबीसी आणि धमकी देणाऱ्या व्यक्तींमध्ये काही लिंक आहे का? याचा तपास करण्याची मागणी देखील आमदार रवी राणा यांनी केली आहे. या संदर्भात आपण पोलीस महासंचालकांनी राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती देखील आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
0 Comments