Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संजय नगर काँग्रेस आणि भाजपमध्ये विकास कामांच्या कामावर रंगले पोस्टर.

 संजय नगर काँग्रेस आणि भाजपमध्ये विकास कामांच्या कामावर रंगले पोस्टर.

------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

बामणोली कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

------------------------------------

संजय नगर शिंदे मळा  

सांगली शहराचा उपनगर असणाऱ्या अभय नगर संजय नगर शिंदे मळा परिसरात सध्या काँग्रेस आणि भाजपा मध्ये विकास कामांचा नऊ कोटींच्या कामावर जोरदार पोस्टर वर पोस्टर लावण्यात आले दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून विकास कामांचे मार्केटिंग करणारे फलक स्थानिक नागरिकांमध्ये मात्र चर्चेचे विषय बनले आहे

सांगलीच्या उपनगर सध्या भाजपाकडून खासदार आमदार निधीतून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत यामध्ये अनेक निधी केंद्र सरकारच्या आहेत 

 त्यामुळे भाजपाकडून या निधी बाबत दावा केला जात आहे. आपला आमदार खासदार यांच्या माध्यमातून सुमारे 50 कोटींची कामे प्रभाग 9 मध्ये केल्याचा दावा आतुर माने यांनी केला आहे याबाबतची फलके वेळोवेळी अतुल माने दीपक माने दरिबा बंडगर श्रीकांत वाघमोडे यांनी वेळोवेळी लावत भाजपाकडून केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे यामुळे उपनगराचा विकास भाजपाने केल्याचा दावा स्थानिक भाजप नेते करीत आहेत तर नुकतेच केंद्र सरकारकडून 9 कोटींची विकास कामे उपनगरात केली जात आहेत .

ही कामे जरी केंद्र सरकारची असली तरी महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने कामे मंजूर झाले असल्याने त्याचे श्रेय काँग्रेस आयुक्त सुनील पवार यांना दिले आहे याबाबतचे आभार मानणारे फलक संतोष पाटील व अन्य नगरसेवकांनी उपनगरात चौका चौकात लावत भाजपाने नाही तर महापालिका आयुक्त मुळे 9 कोटींची कामे केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे या पोस्टर युद्धामुळे मात्र उपनगरातील नागरिकांची मोठी करमणूक सुरू असून नेमका विकास कोणी केला याबाबत आता नागरिक ही संभ्रम अवस्थेत आहेत मात्र यावरून सुरू असणारे पोस्टर वर चर्चेचा विषय सुरू आहे ..

Post a Comment

0 Comments