Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी उपक्रमाचे आयोजन.

 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी उपक्रमाचे आयोजन.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर

-----------------------------

 नगर परिषद रिसोड यांचे वतीने मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्‍या तुलनेत मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी मतदारात मतदानाची जागृती करण्‍यासाठभ्ी रिसोड शहरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे 

     भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्‍ट्राचे नागरीक आहोत सन १९५० च्‍या अगोदरच्‍या सर्व राजेशाही,हुकुमशाही संपवून या देशाच्‍या संविधानाने लिखीत कायदयाचे राज्‍य आणले आणि देशाचा राज्‍य कारभार चालविण्‍यासाठी,देशाचे बाहय व अंतर्गत सरंक्षण करण्‍यासाठी,देशाचा सर्वागीन विकास साधण्‍यासाठी ग्रामंपचयात,नगर परिषद,महानगरपालीका, विधानसभा, लोकसभा अशा ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून पाठविण्‍यासाठी प्रत्‍येक १८ वर्ष वया वरील भारतीय नागरीकास गुप्‍त मतदानाचा असा अमुल्‍य अधिकार दिला आहे तो केवळ अधिकार नसून ते राष्‍ट्रीय कर्तव्‍य आहे. परंतु हे कर्तव्‍य प्रत्‍येक नागरीकांनी पार पाडावे या करीता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची विविध कामाची जबाबदारी शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कडे सोपविण्‍यात आली असून त्‍यामधील स्‍वीप SVEEP,मतदान टक्‍केवारी वाढीसाठी अमंलबजावणी करण्‍याच्‍या उददेशाने रिसोड शहरात विविध उपक्रम घेण्‍यात येत आहे त्‍यामध्‍ये रिसोड शहरातील शाळेतील विदयार्थ्‍यामार्फत चिठठी देवून मुख्‍याधिकरी सतिश शेवदा यांनी पालंकाना व विदयार्थ्‍यांच्‍या क्ंटूंबातील प्रत्‍येक १८ वर्ष वया वरील भारतीय नागरीकास पत्राव्‍दारे मतदान करण्‍याचे आवाहान केले तसेच दिनांक १५/०३/२०२४ रोजी रिसोड शहरातील BLO यांची सभा घेवून प्रत्‍येक बुथ स्‍तरावर मतदानाची टक्‍क्‍ेवारी वाढीसाठी विविध उपक्रमाचे राबविण्‍यात बाबत सुचना देण्‍यात आलया तसेच दिनांक १९/०३/२०२४ रोजी शहरातील भारत माध्‍यमिक विदयालय श्री शिवाजी विदयालय न.प.मराठी शाळा ज्ञानदिप प्राथमिक शाळेचे विदयार्थ्‍यांची रिसोड शहरात भव्‍य असे रॅलीचे आयोजन करण्‍यात आले या माध्‍यमातून मतदारात जनजागृती करण्‍यात आली विदयार्थ्‍यांनी स्‍लोगण /नारे देत रिसोड शहरात मतदारांना मतदान करण्‍याचे आवाहन केले या सर्व उपक्रमाकरीता न.प.रिसोड अधिकारी,कर्मचारी,शिक्षक, भारत माध्‍यमिक विदयालय, श्री शिवाजी विदयालय, ज्ञानदिप प्राथमिक शाळेचे मुख्‍यध्‍यापक शिक्षक इत्‍यादीनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments