म्हैशाळ येथील कृष्णा नदीच्या काठी वसलेले तीर्थक्षेत्र.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
------------------------------------
म्हैशाळ येथील कृष्णा नदीच्या काठी वसलेले तीर्थक्षेत्र श्री कनकेश्वर हे म्हैशाळचे ग्रामदैवत असून महाशिवरात्रीनिमित्त
श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे
रात्रभर जागरण भजन धनगरी ओव्या व आध्यात्मिक उत्सवाचा
कार्यक्रम केला जातो.
आणि दुसऱ्या दिवशी पहाटे महाआरती करून महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी समस्त म्हैसाळकर ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीतील शिवभक्तांसाठी श्री क्षेत्र कनकेश्वर येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
याप्रसंगी श्री कनकेश्वर येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य ना डॉ सुरेश (भाऊ) खाडे यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .
0 Comments