शिवाजी विद्यालय रिसोड ची वेदांती देशमुख जिल्ह्यात प्रथम.

 शिवाजी विद्यालय रिसोड ची वेदांती देशमुख जिल्ह्यात प्रथम.

-------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

----------------------------

 जल जीवन मिशन, जनशक्ती मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता विभाग भारत सरकार, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग कक्ष जिल्हा परिषद वाशिम द्वारा आयोजित निबंध स्पर्धे मध्ये श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड ची विद्यार्थिनी कु. वेदांती दिपकराव देशमुख (वर्ग 7 ब ) ही चा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक येऊन ती रोख रु 21000 च्या पारितोषिकाची  मानकरी ठरल्याबद्दल तसेच कु आरती कैलास भुतडा (वर्ग 11वा विज्ञान) हिचा तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रमाणपत्र व टी-शर्ट देऊन या दोन विद्यार्थिनीचा आज दि.19/03/2024 रोजी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड च्या वतिने सत्कार करण्यात आला, तसेच 

गोमाता संस्कृती एक अनोखी चित्रकला या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रमाणपत्र व कॅलेंडर चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य श्री संजयराव देशमुख, तर  प्रमुख पाहुणे  उपप्राचार्य श्री संजयराव नरवाडे, उपमुख्याध्यापक श्री अशोकराव देशमुख, ज्येष्ठ शिक्षिका शोभा राऊत , खुर्शीद बानो, शिक्षक प्रतिनिधी श्री खुशाल राठोड व्यासपीठावर उपस्थित होते.  यावेळी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक श्री विठ्ठलराव सरनाईक, वेदांतीचे वर्गशिक्षक श्री पांडुरंग वाळले या दोन्ही शिक्षकांचा श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड च्या वतीने शाल देऊन सत्कार करण्यात आला. 

व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भविष्यामध्ये येणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी विद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजयराव देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.उत्तम मोरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.