पत्रकाराला चौकात बसून भीक मागण्याचा दिला सल्लमोप ग्रा.पं.चे सरपंच भागवत नरवाडे विरुद्ध पोलीस तक्रार.

पत्रकाराला चौकात बसून भीक मागण्याचा दिला सल्लमोप ग्रा.पं.चे सरपंच भागवत नरवाडे विरुद्ध पोलीस तक्रार.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

-----------------------------

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनाचे प्रतिबिंब वर्तमानपत्रात छापून येत असते.

तर सर्व गावाला सोबत घेऊन गावाचा विकास करण्याची जबाबदारी ही गावच्या सरपंच सह ग्रामपंचायत वर असते मात्र गावाचा विकास करण्या ऐवजी गावाला लुटण्याचेच काम गेल्या तीन वर्षांत या सरपंच आणि व त्यांच्या टीमने केले.

स्वतःचे गावातील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार केल्यानंतर याची चौकशी रिसोड पं.स. कडून विस्तार अधिकारी खिल्लारी यांचे मार्फत सुरु आहे. हे प्रकरण आता आपल्या अंगलट येणार व याविरुद्ध पेपर मध्ये बातम्या छापून येऊ नये म्हणून सरपंचांनी भर जहागीर येथील पत्रकार अशोक चोपडे यांना धमकी देऊन आपल्या अकलेचे तारे तोडले.

अशीच एक घटना तालुक्यातील मोप ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध गावातीलच एका व्यक्तीने तक्रार दाखल केली त्या भ्रष्टाचाराची चौकशी होत असताना आपले पितळ उघडे पडणार या भीतीने पेपर मधील बातम्या छापून आल्यामुळे आपला राग पत्रकारावर काढत वकिली सनद लावणाऱ्या सरपंचांने पत्रकाराला पत्रकारिता सोडून भीक मागण्याचा अफलातून सल्ला सल्ला देत धमकी दिली.

याबाबत त्याची ऑडिओ क्लिप पत्रकार संघाच्या ग्रुप वर आल्यानंतर याबाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व संलग्न पत्रकारांची तातडीची बैठक रिसोड कार्यालयात झाली.

त्यानंतर सदरची ऑडिओ क्लिप रिसोड ठाणेदारांना ऐकवण्यात आली.

त्यानंतर तक्रारीचे निवेदन ठाणेदार यांना देण्यात येऊन त्याची नोंद घेण्यात आली

यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच भागवत एकनाथ नरवाडे यांनी पत्रकार अशोक हरिभाऊ चोपडे यांचे वर राग काढत सुरुवातीला तुमच्या विरुद्ध आमच्या गावात महिलेची छेडखानी केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे अशी धमकी दिली व खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर अशोक चोपडे यांनी फोन कट केला असता परत फोन करून तुम्ही एखाद्या झाडाला लटका व स्वतःचा हात मोडून गळ्यात बांधून घेऊन तुम्हाला जास्त पैसे मिळतील तेंव्हा रिसोड चौकात बसून भिक् मागा असा सल्ला दिला सोबतच हात पाय तंगडी तोडण्याची भाषा वापरत एकेरीच्या भाषेत धमकी दिली.

त्यावर समाजामध्ये पत्रकाराना धमकी देण्याच्या घटना दिवसे दिवस वाढत असताना पत्रकारावर हल्लेही होत आहेत

याबाबत पत्रकार संघाचे वतीने या सरपंचाचा जाहीर निषेध करण्यात येऊन तक्रारीचे निवेदन रिसोडे ठाणेरांना देण्यात आले.

ठाणेदार यानी पूर्ण रेकॉर्ड ऐकुन स्टेशन डायरी वर नोंद घेतली. यावर चौकशी करून गुन्हाही दाखल करू असे आश्वासन उपस्थित पत्रकार बांधवांना दिले.

यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष निनादबापू देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष गणेश देगावकर, तालुका अध्यक्ष शेख खाजा शेख फरीद, अरुणभाऊ क्षीरसागर, नारायणराव आरू, केशव गरकळ, धैर्यशील जोशी, डॉ विलास ठाकरे, डॉ. प्रल्हाद कोकाटे ,डॉ, रामेश्वर रंजवे, अमर रासकर ,संदीप देशमुख, प्रदीप खंडारे ,गजानन खंदारे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.