Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय सेवा योजनेचा खडकी सदार येथे समारोप.

 राष्ट्रीय सेवा योजनेचा खडकी सदार येथे समारोप. 

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

----------------------------------

रिसोड: महिला उत्कर्ष प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या‎ तालुक्यातील खडकी सदार (दु) येथे सुरू‎ असलेल्या सात दिवसीय निवासी‎ शिबिराचा समारोप झाला. या‎ शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या‎ स्वयंसेवकांनी गावात ग्रामस्वच्छता,‎ जलसंधारणाची कामे, शोषखड्डे‎ खोदणे, नाल्यांची साफसफाई आदी‎ कामे केली.


या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयावर गावातील लोकांना माहिती दिली. सकाळी कार्यक्रमाची सुरुवात योगासने व नंतर गावांमध्ये प्रभात फेरी काढून त्यामध्ये विविध पथनाट्य सादर करण्यात आली होती. त्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव स्वच्छता व्यसन निर्मूलन इत्यादी पथनाट्य सादर करण्यात आले. दुपारच्या वेळेस विविध बौद्धिक सत्र व त्यामध्ये विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना व कार्य यामध्ये डॉक्टर प्रवीण हाडे (क्षेत्रीय समन्वयक राष्ट्रीय रिसोड मालेगाव)यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्याबाबत‎ जागृती, योग-प्राणायाम, महिला‎ मेळावा, गुणदर्शनासह रक्तदान‎ शिबिर घेण्यात आले.


कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कोमल राऊत हिने सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments