लोह्यात शुद्ध व शीतल पाणपोईचे उद्घाटन.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
--------------------------------
उन्हाळ्याची तीव्र दाहकता जाणवत असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती पाहता लोहा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मधू पाटील पवार यांच्या पुढाकारातून कृषी उत्पन्न बाजार समिती कमान दोन समोर नागरिकांसाठी शुद्ध व शीतल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सदरील पाणपोईचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते मधू पाटील पवार व मुरंबीचे सरपंच राम पाटील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
दिवसेंदिवस उन्हाळा अधिकाधिक तीव्र होत असून पाण्याची तीव्र टंचाई होत असताना हॉटेल मध्ये पाणी पिण्यासाठी गेले असता चहा किंवा कांहीं घेतले तर पिण्यासाठी पाणी मिळेल असा सल्ला वजा सूचना हॉटेल व्यावसायिकांकडून नागरिकांना देण्यात येत असताना लोहा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटील पवार यांच्या पुढाकारातून लोहा नगर पालिका समोरील कृषी उत्पन्न बाजार समिती कमान दोन समोर शुद्ध व शीतल जलसेवा सुरू करण्यात आली असून सदरील पाणपोईचे उद्घाटन मधू पाटील पवार व सरपंच राम पाटील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बहुसंख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
0 Comments