Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूरसाठी 3 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्रे केली दाखल.

 कोल्हापूरसाठी 3 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्रे केली दाखल.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

------------------------------

कोल्हापूर दि.15 (जिमाका): 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 3 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.


     47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज संजय सदाशिवराव मंडलिक (पक्ष - शिवसेना) यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे 4 नामनिर्देशन पत्रे दाखल केली. तसेच सौ. रुपा प्रविण वायदंडे (पक्ष - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए ) व संजय भिकाजी मागाडे (पक्ष - अपक्ष) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले.


48 हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी आज धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष - शिवसेना) यांनी 4 नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केली.


तसेच 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी आज राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (पक्ष - स्वाभिमानी पक्ष) यांनी 2 नामनिर्देशनपत्रे तसेच शिवाजी धोंडीराम संकपाळ (पक्ष - अपक्ष), महंमद मुबारक दरवेशी (पक्ष - अपक्ष) आणि संतोष केरबा खोत (पक्ष - कामगार किसान पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.


     47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज 7 उमेदवारांना 23 नामनिर्देशनपत्रांचे तर 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 19 उमेदवारांना 37 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आहे.

     *****

Post a Comment

0 Comments