Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर जिल्हयात पोलिस रेकॉर्डवरील चौघांना केले कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार: आणखीन ६३ जणांविरुद्ध हददपारीचे प्रस्ताव.

 कोल्हापूर जिल्हयात पोलिस रेकॉर्डवरील चौघांना केले  कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार: आणखीन ६३ जणांविरुद्ध  हददपारीचे प्रस्ताव.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

गांधीनगर: प्रतिनिधि 

आदित्य नैनानी 

---------------------------------

लोकसभा निवडणुक - २०२४ आदर्श आचार संहिता लागु झालेली असुन, निवडणुक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणामध्ये पार पाडणे आवश्यक असल्याने लक्ष्मीपूरी, इचलकरंजी व शिवाजीनगर पोलीस ठाणे कडुन पाठविणेत आलेल्या हद्दपारीचे प्रस्तावापैकी हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यानी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची मिटींग घेवुन पोलीस ठाणे हद्दीतील समाजकंटक त्याचप्रमाणे निवडणुकीमध्ये व्यत्यय निर्माण करणारे, रेकॉर्ड वरील गुन्हेगार यांचेवर कठोर प्रतिबंधक कारवाया करणे बाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.पोलीस अधीक्षक , कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे पोलीस ठाणे स्तरावर गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी करुन लोकसभा निवडनुकीच्या पर्श्वभुमीवर हद्दपारीची कारवाई करणे आवश्यक असणा-या समाजकंटकांची यादी तयार केलेली आहे. त्याप्रमाणे मुंबई पोलीस अधिनियमा अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन हद्दपार करणे करीता प्रस्ताव सादर करणेचे काम सुरु आहे. सन २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्हयातुन महाराष्ट्र पोलीस अधिनियमातंर्गत एकुण ६३ समाजकंटका विरोधात विरुध्द हददपारीचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्याअनुषंगाने हद्दपार करणेची प्रक्रिया सुरु आहे.

लक्ष्मीपूरी, इचलकरंजी व शिवाजीनगर पोलीस ठाणे कडुन पाठविणेत आलेल्या हद्दपारीचे प्रस्तावापैकी हद्दपारीचे आदेश जारी केलेल्या समाजकंटकांची माहिती.

अन हद्दपार इसमाचे नाव, वय पत्ता ० १ अविनाश अशोक माने वय २९ रा. सोमवारपेठ कोल्हापूर ०२ | प्रदिप शिवाजी कांबळे, वय - ३२ रा. मलाबादे शाळेच्या मागे साईट ० ३ | राजेश कृष्णात कुंभार, वय ५१ ०४ प्रेम राजु आवळे, वय २३ | न.१०२ सहकार नगर कोल्हापूर रा.घर न.५४४ /१ मधुबन हौसिंग सोसायी महादेव मंदीर जवळ सोलगे मळा इचलकरंजी रा.भाग्यरेखा टॉकीज समोर सिध्दार्थ होसिंग सोसायटी इचलकरंजी हद्दपारीक्षेत्र व कालावधी कोल्हापूर जिल्हयातुन ० १ वर्षा करीता हद्दपार कोल्हापूर जिल्हयातुन ०२ वर्षा करीता हद्दपार कोल्हापूर जिल्हयातुन ०१ वर्षा करीता हद्दपार कोल्हापूर जिल्हयातुन ०२ वर्षा करीता हद्दपार.

प्रस्तावाचे सुनावणीअंती सदरची हद्दपारीची कारवाई ही उप विभागीय दंडाधिकारी इचलकरंजी विभाग व उप विभागीय दंडाधिकारी करवीर विभाग यांनी केलेली असुन, अन्य प्रलंबीत असलेल्या प्रस्तावांची सुनावणीचे काम सुरु आहे. लवकरच सकारात्मक आदेश पारित होतील. हद्दपारीची कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीमध्ये आढळुन आल्यास, संबधीत पोलीस ठाणेस संपर्क साधुन माहिती देणे बाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नागरीकांना अवाहन केलेले आहे .

Post a Comment

0 Comments