Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कु,तनुश्री गजानन बाजड चे सुयश.

 कु,तनुश्री गजानन बाजड चे सुयश.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर 

------------------------------

 महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध परीक्षा 2023 अंतर्गत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती, रिसोड तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी ही परीक्षा दिली होती या परीक्षेचा निकाल एक महिन्यापूर्वी जाहीर झाला होता, यावेळी बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेमध्ये पासही झाले होते, परंतु मेरिट लिस्ट लागणे बाकी होती, ज्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या मेरिट लिस्ट मध्ये निवड होते तेच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील मेरिट लिस्ट रात्री जाहीर झाली, त्यामध्ये रिसोड तालुक्यामधून. कु,तनुश्री गजानन बाजड , कु,कृष्णाली प्रशांत खोडके , यांची निवड झाली, या विद्यार्थिनींना आता शासनातर्फे इयत्ता बारावी पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे, या परीक्षेमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी ,शालेय क्षमता चाचणी ,सामान्य ज्ञान, समाजशास्त्रे गणित इत्यादी विषय विषयावर चाचणी घेण्यात आली होती, यावेळी शाळेमधून या दोन विद्यार्थ्यांची निवड झाल्याने शाळेचे विश्वस्त, प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले या विद्यार्थिनीं,विद्यार्थ्यांनी निवडीचे श्रेय आपल्या शिक्षकांना खऱ्या अर्थाने दिले.

Post a Comment

0 Comments