Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दारुड्या कार्यकर्त्यांचा प्रचार उमेदवारांसाठी ठरतोय अपप्रचार!

दारुड्या कार्यकर्त्यांचा प्रचार उमेदवारांसाठी ठरतोय अपप्रचार!

---------------------------- 

फ्रंटलाईन न्यूज् महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

---------------------------- 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला अकोला लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. अकोला मतदार संघाची निवडणूक अतिशय चुरशीची होत आहे. महायुतीचे अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे ऍड प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तिरंगी मुकाबला होणार हे निश्चित.सध्यातरी तिन्ही उमेदवारांना निवडून येण्याची समान संधी आहे. अटीटतीच्या लढतीत कोण निवडून येईल हे सांगणे राजकीय जानकाराच्या आकलनशक्तीच्या आणि तर्कशक्तीच्या बाहेर आहे. आता फक्त काही दिवस प्रत्यक्ष मतदानाला शिल्लक राहले असताना जो उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे व शिस्तशीरपणे प्रचार करतील तोच उमेदवार विजयी होणार आहे. त्यामुळे तिन्ही उमेदवाराचे कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी अतिशय प्रामाणिकपणे सर्व शक्तिनीशी प्रयत्न करित आहेत. आपल्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह आणि उमेदवाराचा परिचय आणि पक्षाचा जाहीरनामा सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचवीत आहेत. मतदार सुद्धा आशा कार्यकर्त्यांच्या प्राचाराला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.त्यामुळे उमेदवारांच्या मतात नक्कीच भर पडत आहे.परंतु काही दारुडे, नशिडे कार्यकर्ते दारू पिऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गावखेड्यात, वस्ती वाड्यात, शहरातील गल्ली बोळात जाऊन अतिशय बेशिस्त आणि बेजबाबदार भाषा शैलीचा उपयोग करून प्रचार करित आहेत आशा दारुड्या कार्यकर्त्यांच्या या प्रचारामुळे सभ्य लोकांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. गावाखेड्यात दारू पिऊन अवेळी जाऊन फुकटची गाडी आणि फुकटची दारू पिऊन

 आम्ही किती निष्ठावंत आणि हितचिंतक कार्यकर्ते आहोत हे सिद्ध करण्याच्या प्रयत्न करतात.

दारुड्याच्या तोंडाचा व अंगाचा येणारा वास यामुळे ज्यांच्याकडे हे प्रचाराला जातात त्यांना ही बाब अतिशय क्लेशदायक वाटते परंतु त्यांच्यसमोर बोलता येत नसल्यामुळे याचा परिणाम त्या उमेदवारावर होतो.मत वाढण्याऐवजी उलट कमी होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. असा दारू पिऊन वा नशा करून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर संबंधित पक्षाच्या पदाधिकारी व जबाबदार व्यक्तींनी अंकुश लावणे अवश्य आहे अन्यथा आशा दारुड्यानी केलेला प्रचार हा उमेदवारासाठी अपप्रचार ठरेल आणि प्रामाणिकपणे प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरेल.

Post a Comment

0 Comments