चेतन नरकेंची लोकसभा निवडणुकीतून माघार.
चेतन नरकेंची लोकसभा निवडणुकीतून माघार.
----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
कोल्हापुर प्रतिनिधी
अन्सार मुल्ला
----------------------------------
गोकुळ संचालक चेतन नरके यांनी आज पत्रकार परिषदेत लोकसभेच्या रणांगणातून माघार घेतल्याची घोषणा केली. यावेळी चेतन नरके भूमिक झाले होते. आगामी काळात पुढील दहा दिवसात आपला व आपल्या गटाचा पाठिंबा किंवा भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगत त्यांनी मतदानात महायुती किंवा महाआघाडी यांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका आज तरी गुलदस्त्यात ठेवली आहे.
चेतन नरके हे गेले तीन वर्षे स्वतंत्ररीत्या लोकसभेची तयारी करत होते. महाविकास आघाडीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र वरिष्ठ पातळीवरील घडामोडी आणि जिल्ह्यातील राजकारणामुळे महाविकास आघाडी कडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईला यश आलं आहे, असं सूत्रांकडून समजते. सकाळी दूरध्वनी वरून चेतन नरके यांचा त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर आज दुपारी तातडीने चेतन नरके यांनी पत्रकार परिषद घेत, निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. चेतन नरके यांच्या पाठीमागे पन्हाळा, शाहूवाडी शहर ,करवीर तसेच अन्य जिल्ह्यातील ठिकाणाहून गोकुळ असेल किंवा त्यांचा वैयक्तिक लोकसंग्रह या सर्वांची गोळाबेरीज केली तर चेतन नरके हे काही लाखात मतांची विभागणी करण्यास सक्षम असे अपक्ष उमेदवार ठरले असते. आता आगामी काळात चेतन नरके कोल्हापुरातील कोणत्या उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवतात यावर या निवडणुकीतील उमेदवारांच्या जय पराजयाचे मोठं गणित उलगडणार आहे.
Comments
Post a Comment