Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

त्या आल्या,त्यांनी पाहिले आणि भारावून गेल्या.

 त्या आल्या,त्यांनी पाहिले आणि भारावून गेल्या.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी

 शेखर जाधव

------------------------------

स्वित्झर्लंडच्या विदुषीने दिली भणंग प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट.शैक्षणिक क्षेत्रात अधिकारी असलेल्या स्वित्झर्लंडच्या श्रीमती *इवॉन रिजाईन* यांनी भणंग प्राथमिक शाळेला अभ्यासभेट दिली.यावेळी भणंग शाळेच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.प्रारंभी त्यांनी स्वित्झर्लंडची शिक्षण पद्धती आणि स्वतःची ओळख करून दिली.यावेळी भणंग शाळेतील विविध उपक्रमांची त्यांनी पहाणी करून तोंडभरून कौतुक केले.त्यांनी शाळेचे उपक्रम आणि विद्यार्थी,शिक्षक,ग्रामस्थ यांच्या समवेत छायाचित्रे घेतली.भणंग शाळा आणि अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना त्यांनी स्वित्झर्लंड येथील शैक्षणिक साहित्य व चॉकलेट दिली.एक चांगली शाळा पाहिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी ब्रेन योगा मार्गदर्शक संजय घोरपडे,पत्रकार मोहन जगताप,भणंग गावचे सरपंच गणेश जगताप,मुख्याध्यापक डी.टी.धनावडे, अशोक लकडे,आशा साळुंखे,विश्वास भिसे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,ग्रामस्थ,पालक,विद्यार्थी व अंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments