Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रफुल्ल प्रकाश पाटील ऑनररी डॉक्टरेट पदवीने सन्मानित.

 प्रफुल्ल प्रकाश पाटील ऑनररी डॉक्टरेट पदवीने सन्मानित.

कोल्हापूर: क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील विविध शैक्षणिक, सामाजिक,कला,क्रीडा उपक्रम राबविणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित सिद्धाई एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल प्रकाश पाटील यांना गांधी पीस फाउंडेशन, नेपाळच्या वतीने ऑनररी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

गांधी पीस फाउंडेशन, नेपाळच्या वतीने ऑनररी डॉक्टर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पुणे येथील ग‌.दि. माडगूळकर हॉल येथे आयोजित केला होता.

डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी गेल्या तेवीस वर्षात सिद्धाई एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेऊन त्यांना मोफत शिक्षण दिले, ऊसतोड कामगारांच्या मुलांना उसाच्या फडीत जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणले, या दरम्यान जणार्थ साखरशाळा या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले, विशेष मुलांच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून असताना त्यांच्या समस्या समजून घेतल्या,गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण, महिला व मुलींना मोफत लाठी-काठी, लेझीम प्रशिक्षण, गरजूंना कपडे, अन्नधान्य वाटप, कोरोना काळात मोफत औषध वाटप व जनजागृती, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अशा शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन ही मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

यासाठी आजी काशीबाई लक्ष्मण पाटील जैताळकर, वडील प्रकाश पाटील, आई अनिता पाटील, मेन राजाराम हायस्कूलच्या व्यावसायिक शिक्षिका दिपाली पाटील, विलास पाटील यांचे सहकार्य लाभले.

यावेळी प्रफुल्लीत केंद्राच्या संचालिका डॉक्टर अल्फिया बागवान, सहाय्यक शिक्षिका रेश्मा कातकर, सिद्धेश चिले तसेच विद्यार्थी व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments