---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
---------------------------
कोल्हापूर रत्नागिरी रोडवर असलेल्या वडणगे फाट्याजवळ बेकायदेशीर विनापरवाना दारूची वाहतूक करताना करवीर पोलीस गुन्हे शोध पथकांने कारवाई करून वेगवेगळ्या कंपनीच्या दारूसह गुन्हयात वापरलेल्या इको कारसह पाच लाख 70 हजार 210 रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला
या घटनेची हकीकत अशी की .
कोल्हापूर रत्नागिरी रोडवर असलेल्या वडणगे फाट्याजवळ पांडुरंग धोंडीराम पाडेकर हे वर्ष 58 राहणार पाटील गल्ली मु. पो. निवडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर हा पांढऱ्या रंगाच्या इको कार एम एच 09 - 17 66 मधून अवैध विदेशी दारूची वाहतूक बेकायदेशीर रित्या करणार असल्याचे खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांना मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालीदंर जाधव पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर सुजय दावणे विजय तळसकर रणजीत पाटील प्रकाश कांबळे अमोल चव्हाण योगेश शिंदे अमित जाधव विजय पाटील धनाजी बर्गे यांनी आंबेवाडी येथील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपाच्या दोन्ही बाजूस थांबून सापळा लावला व पांढऱ्या रंगाची इको कार mh 09 17 66 ही गाडी कोल्हापूर रत्नागिरी रोड वरुन कोल्हापूरच्या दिशेने येत असताना दिसली त्या कारला थांबण्याचा इशारा देतात ती कार थांबली सदर गाडीची झडती घेत असताना गाडीच्या पाठीमागे असलेल्या डिगीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले वेगवेगळ्या दारुच्या बाक्ससह इको कार असा एकूण 5,70, 210 रुपयाचा मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेण्यात आला
0 Comments