Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी विद्यालय रिसोड चा विद्यार्थी नवोदय प्रवेशास पात्र.

 श्री शिवाजी विद्यालय रिसोड चा विद्यार्थी नवोदय प्रवेशास पात्र.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर 

--------------------------------------

 येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड चा विद्यार्थी गौरव किसन वानरे हा वर्ग सहावी साठी घेण्यात आलेल्या नवोदय प्रवेश पात्र परीक्षेस उत्तीर्ण झाला असून शहरी भागातून रिसोड शहरातून त्याचा प्रवेश नवोदय विद्यालय वाशिम साठी निश्चित झाला आहे. त्याबद्दल त्याचे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे कोषाध्यक्ष श्री प्रदीपराव देशमुख, स्व.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम चे अध्यक्ष तथा शिवाजी किड्स वाशिम चे अध्यक्ष स्नेहदीपभैय्या सरनाईक, स्थानिक शाळा समिती संचालक संजय कुमार जिरवणकर, ॲड.भूषण पंजाबराव देशमुख, प्राचार्य संजयराव देशमुख, उपप्राचार्य संजयराव नरवाडे, उपमुख्याध्यापक अशोकराव देशमुख, मराठी प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन देशमुख, उर्दू प्राथमिक चे मुख्याध्यापक अनिस खान हे उपस्थित होते.

 दरवर्षी नवोदय प्रवेश परीक्षा घेण्यात येते. शहरी भागातील विद्यार्थ्यांना मर्यादित प्रवेश देण्यात येतात त्यातही रिसोड शहरातील गौरव किसन वानरे हा एकमेव विद्यार्थी या प्रवेशास पात्र ठरल्यामुळे संपूर्ण शहरांमध्ये त्याचे कौतुक होत आहे. त्याबद्दल त्याचे मार्गदर्शक शिक्षक श्री पांडुरंग वाळले, श्री विजय नागरे, कु.निता गिऱ्हे,श्री विठ्ठलराव सरनाईक यांचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे अध्यक्ष तथा शिक्षक आमदार ॲड.किरणराव सरनाईक, सौ.अनिताताई सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुणराव सरनाईक, सचिव श्री भिकाजीराव नागरे यांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments