Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उचगाव मंगेश्वर त्रैवार्षिक यात्रा शुक्रवार पासून सुरु; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

 उचगाव मंगेश्वर त्रैवार्षिक यात्रा आज पासून सुरु; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

 यात्रा कमिटी व ग्रामपंचायतीच्या वतीने जय्यत तयारी पूर्ण 

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

उचगाव वार्ताहर

----------------------------

 उचगाव ता.करवीर येथील ग्रामदैवत श्री मंगेश्वर देवाची त्रैवार्षिक यात्रा आज शुक्रवार पासून सुरु होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे व स्पर्धेचे, मनोरंजनाचे आयोजन केले असून स्वच्छता, सुरक्षिततेसह सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत अशी माहिती सरपंच तथा यात्रा कमिटी अध्यक्ष मधुकर नामदेव चव्हाण यांनी दिली.यावेळी उपसरपंच सारिका मनोज माने,सचिव श्रेयश उर्फ जॉन्टी भूषण कदम, सहसचिव प्रीतम बाळासो साळोखे, खजानीस अमोल तानाजी भोसले, उपखजानीस सुनील रामचंद्र चौगुले तसेच यात्रा कमिटी सदस्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी गांधीनगर पोलिसांसह खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.यात्रा काळात मुबलक पाणी पुरवठा करण्यात येत असून स्वच्छतेवर भर ठेवण्यात आला आहे.

  दरम्यान गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धा (युपीएल), कबड्डी स्पर्धा होणार असून व्हॉलीबॉल स्पर्धा, गुरुवारी (ता. १८) रांगोळी स्पर्धा, तसेच सायंकाळी घागर डोक्यावरून घेऊन पळणे, शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे. यात्रेचा पहिला दिवस शुक्रवारी (ता. १९) असून देवास पेहरावा,देव जळास जाणे भव्य आतिषबाजी आदी धार्मिक कार्यक्रमांसह या दिवशी सकाळी मुलाच्या व मुलींच्या धावणे स्पर्धा, सायंकाळी ढोल बांधणे स्पर्धा, देव जळात जाणे हा मुख्य विधी होईल. शनिवारी (ता. २०) सायकल स्लो, मोटारसायकल, श्वान पळवणे, हलगीवादन स्पर्धा, धनगरी ओव्यांच्या स्पर्धा होणार आहेत. रविवारी (ता. २१) बैल सजावट, म्हैस सजवणे, मेंढी पळवणे, रेडकू पळवणे, धनगरी ढोलवादन स्पर्धा आहे. सोमवारी (ता. २२) ट्रॅक्टर ट्रॉली रिव्हर्स पळवणे, तसेच निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती हर्षद सदगीर विरुद्ध माऊली कोकाटे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील

विरुद्ध भारत मदने. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान हसन पटेल यांच्यात होणार आहे. मंगळवारी (ता. २३) बकऱ्यांच्या टकरी, बुधवारी (ता. २४) बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. यामध्ये घोडा गाडी सिंगल घोडा जनरल बैलगाडी गावगना बैलगाडी शर्यत होणार आहे. शिवाय २० ते २६ एप्रिलपर्यंत मनोरंजन कार्यक्रम मंगेश्वर देवालय चौक व ग्रामपंचायत पटांगणात होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीने केलेले आहे.

फोटो - ग्रामदैवत श्री मंगेश्वर

Post a Comment

0 Comments