Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भाजपचा पहिला तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर!

 भाजपचा पहिला तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर!

मत पत्रिका तयार. ७(अ)लाख निवडणूक आयोगाची मान्यता.

----------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी एन देशमुख.

----------------------------------

अमरावती.

उमेदवारी अर्जाचा टप्पा आटोपल्यानंतर आता निवडणूक यंत्रणा मतदानाच्या प्रक्रियेच्या तयारीला लागली आहे. यामध्ये उमेदवारांचा मराठी वर्णमालेनुसार क्रम निश्चित करण्यात येऊन आयोगाची मान्यता घेण्यात आली. यामध्ये भाजपचा उमेदवार पहिल्या, काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या, तर बसपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी अर्जाची माघार झाल्यानंतर अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली व लगेच रिंगणातील उमेदवारांना निवडणुकीचे चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मतपत्रिकेसाठी नियमानुसार क्रम निश्चित करण्यात येऊन नमुना ७(अ) निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला. व त्यांच्या मान्यतेनंतर नमुना ७(अ) प्रसिद्ध करण्यात आला. मतपत्रिका व ईव्हीएम वर उमेदवारांचा हाच क्रमांक राहणार आहे. शिवाय मंगळवारी दुपारी ३ पूर्वी या मतपत्रिका अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदार असलेल्या २६८९ सेवा दलातील मतदारांच्या अभिलेखा कार्यालयात"इ टी पी बी एस"या यंत्रणेद्वारे पाठविण्यात आलेले आहेत. लोकसभेसाठी यावेळी ३७ उमेदवार रिंगणात आहेत व आयोगाने मान्यता दिलेल्या क्रमांक नुसारच या मतपत्रिका टपाली मतदानासाठी व ईव्हीएम वर राहणार आहेत. शिवाय घरून मतदान करणारे ८५ वर्षावरील जेष्ठ मतदार व दिव्यांग बांधव यांच्या टपाली मतपत्रिकेतही हाच क्रम राहणार आहे. राष्ट्रीय पक्ष पहिल्यांदा, नंतर प्रादेशिक पक्ष. नमुना ७(अ) मध्ये सुरुवातीला राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे तीन उमेदवारांचा समावेश आहे, तर त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या ११ उमेदवारांचा समावेश आहे. व त्यानंतर २३ अपक्षांची वर्णी लागली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार क्रम तयार करताना मराठी वर्णमालेचा वापर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली. पुढील मतपत्रिका क्रम असे आहे. मतपत्रिकेत राष्ट्रीय पक्ष भाजपाचा उमेदवार पहिल्या क्रमांकावर, काँग्रेसचा उमेदवार दुसरा क्रमांक वर व बीएसपी चा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा क्रम आहे. यामध्ये चौथ्या क्रमांकावर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक), पाचवा रिपब्लिकन सेना, सहावा अ.भा. परिवार पार्टी,सातवा राष्ट्रीय ओला पार्टी,पार्टी, आठवा न.भा. एकता पार्टी, नवा प्रहार पार्टी, दाहवा जनहित पार्टी, ११वा ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची उमेदवार, व त्यानंतर २३ पक्षांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments