Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

युवराज पाटील फाउंडेशन मार्फत आस्था संस्थेस मदत.

 युवराज पाटील फाउंडेशन मार्फत आस्था संस्थेस मदत.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 शाहूवाडी प्रतिनिधी

-----------------------------

 शाहूवाडी तालुक्यातील घुंगुर येथील गोरगरीब वंचितांचे तारणहार सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांचे वाढदिवसानिमित्त दिव्यांगाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या आस्था अपंग संस्था शाहुवाडी येथील संस्थेने कायमस्वरूपी पालकत्व स्वीकारलेल्या निराधार दिव्यांग बांधव भगिनींना जीवनावश्यक वस्तू व २५ अपंग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य (दप्तर, वह्या, पेन ,कंपास पेटी, चित्रकला वही, रंगपेटी )संस्थेच्या कार्यालयात प्रदान करण्यात आले.

                    आस्था अपंग संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाजीराव वारंग मनोगतात म्हणाले की, युवराज पाटील साहेब यांचे समाजसेवेचे आकाशाला गवसणी घालणारे कार्य असून तालुक्यामध्ये हजारो गोरगरिबांना याचा लाभ झाला आहे आणि आमच्या आस्था संस्थेस दिलेली मदत निश्चितच अनमोल असून अपंग बांधव भगिनींना आधार देणारी आहे. युवराज पाटील फाउंडेशन नेहमीच आस्थाच्या कार्यास मदत करणार असल्याची ग्वाही फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगताद्वारे दिली. कार्यक्रमाप्रसंगी दीपक पाटील, रणजीत चौगुले, पांडुरंग संकपाळ, कुमार सावंत, लक्ष्मण भेडसे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments