Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमन पदी मधुसूदन मोहिते-पाटील यांची फेर निवड.

 श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमन पदी मधुसूदन मोहिते-पाटील यांची फेर निवड.

-------------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

पी एन देशमुख.

-------------------------------

अमरावती.

श्री गाडगे महाराज मिशन मुंबई चे अध्यक्षपदी माजी मंत्री तथा आ. यशोमती ठाकूर तर चेअरमन पदी मधुसूदन मोहिते-पाटील यांची बहुमताने फेर निवड झाली. संस्थेच्या नूतन कार्यकारणी निवडसाठी भिवाळी-वज्रेश्वरी, जि. ठाणे येथे झालेल्या मिशनची सर्वसाधारण सभा पार पडली. मिशनची नूतन कार्यकारणीत उपाध्यक्ष उत्तमराव देशमुख (अमरावती), सचिव विश्वनाथ नाचवणे (पालघर), सचिव घोंगटे(यवतमाळ), खजिनदार ज्ञानदेव महाकाल (अमरावती), अशोक पाटील (अहमदनगर) तर सदस्य आश्विन भाई मेहता (मुंबई), रुक्मिणी सातपुते (सोलापूर), चंद्रकांत माने (सातारा), अनिल आवटे (ठाणे), सुनील बाविस्कर (नाशिक), चंद्रकला पाचंगे (सोलापूर), अजित टेमकर (अहमदनगर), ललित उजेडे (चंद्रपूर) यांचा समावेश आहे. यापूर्वी माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, अच्युतराव देशमुख, यशवंतराव माने, विश्वनाथ वाघ महाराज यांनी संस्थेचे अध्यक्ष पदाचे काम पाहिले आहे. संत गाडगेबाबांनी १९५२ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विशेषतः आदिवासी, भटक्या विमुक्त्यासाठी आश्रम शाळा, वस्तीगृह, वृद्धाश्रम, बालकाश्रम, धर्मशाळा, अन्नदान सदावर्त गौरक्षण इत्यादी उपक्रम राज्यभर विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. आदिवासी, भटक्या विमुक्त साठी आश्रम शाळा आदी उपक्रम संस्थेमार्फत राबवत आहे.

Post a Comment

0 Comments