क्लास संचालकांना विश्वासात घेऊनच महाराष्ट्र सरकारने कायदा करावा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश.

 क्लास संचालकांना विश्वासात घेऊनच महाराष्ट्र सरकारने कायदा करावा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

----------------------------------------

मिरज मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत औरंगाबाद खंडपीठांमध्ये प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय पवार यांच्या वतीने सीनियर कौन्सिलर अँड राजेंद्र देशमुख अँड देवांग देशमुख व अँड अमोल जोशी यांनी 21 मार्चला रेट पिटीशन केले व 28 मार्चला ते दाखल करून घेण्यात आली 3 एप्रिलला न्यायमूर्ती रवींद्र भुंगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्या बेंच ने कायदा करण्यापूर्वी क्लास संचालकाचे व क्लास संचालक संघटनेचे मत एकूण त्यांना विश्वासात घ्यावे असा आदेश दिला.

दहा-बारा दिवसात रिट पिटीशन वर आदेश मिळवून अतिशय वेगवान पद्धतीने हालचाली करून आदेश मिळवल्याबद्दल प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय पवार सर यांनी अँड राजेंद्र देशमुख अँड देवांग देशमुख व अँड अमोल जोशी यांचे अभिनंदन केले.

अशी माहिती प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्राचे माजी राज्य अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र फडके यांनी एकत्र पत्रकार द्वारे दिली.

या ऐतिहासिक वेगवान निर्णयामुळे महाराष्ट्रातील क्लास संचालकाला दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारने जानेवारीमध्ये काढलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस मध्ये प्रवेश घेता येत नव्हता त्यामुळे महाराष्ट्रातील क्लास संचालकात अतिशय चिंतेचे वातावरण होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.