साधी राहणी आणि उच्च विचार असणारे शाहू महाराज - मधुरिमाराजे छत्रपती,राधानगरी संपर्क दौरा.
----------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------
श्रीमंत शाहू महाराजांनी समाजासाठी कामे केली पण त्या कामांची कधी जाहिरात केली नाही साधी राहणी आणि उच्च विचार असणारे शाहू महाराज असल्याचं प्रतिपादन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केलं त्या राधानगरी इथं महिला संपर्क मेळाव्यात बोलत होत्या.
Vo - राधानगरी इथल्या दलित वस्तीमध्ये मधुरिमाराजे यांचा राधानगरी परिसरातील विविध ठिकाणी संपर्क दौरा झाला.यावेळी मधुरिमाराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात केलेल्या कामांचा आजच्या सातव्या पिढीला लाभ होतोय,त्यांचाच वसा आणि वारसा त्यांचे पणतु श्रीमंत शाहू महाराज यांनी जपलाय,मराठा आरक्षण,टोल आंदोलन आशा आंदोलनामध्ये सहभाग घेतला,कोल्हापूरातील शांतता यात्रेचं नेतृत्व महाराजांनी केलं,कोरोना आणि कोल्हापूरच्या पुरस्थितीतही योगदान दिलं.त्यांनी सामाज्यासाठी केलेली जाहिरात कधी केलेली नाही,राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची शिदोरी त्यांनी जपल्याचं सांगितलं.गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्ये यांनी विचारांना पाठिंबा देणारा समाज असल्याचं सांगत राधानगरीच्या नागरिकांच्या विकासात शाहू महाराजांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं.राधानगरीच्या नागरिक शिल्पा कांबळे यांनी आमच्या दलित समाज्याच्या वस्तीला घरकुल बांधण्यासाठी जागा नव्हती श्रीमंत शाहू महाराजांनी १९७० च्या दशकात आपली स्वतःची जमीन आमच्या सामाज्यासाठी दिली त्यांनी खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांचा वारसा चालवलाय,त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी आल्याने मताच्या रूपातून साधणार असल्याचं सांगितलं.
यावेळी यशवंत कांबळे,तालुका काँग्रेसचे सरचिटणीस संजय माळकर यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे,सुधाकर साळोखे,रमेश बाचाटे,प्रकाश चांदम,मयूर पोवार,दादासाहेब सांगावकर, आरती तायशेट्ये,प्रकाश बालनकर,जयसिंग सांगावकर,रवी मरगळे,बाळासो कांबळे,रमजान मुल्लानी,मिथुन पारकर,सुरेश बाचाटे,ओमकार निंबाळकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments