Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अनैतिक संबंधातून अबंप येथे निघृण खून.

 अनैतिक संबंधातून अबंप येथे निघृण खून.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------

अंबप येथील आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या रोडवर तीस वर्षीय अमीर करीम मुल्ला याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार घातल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी बाराच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मारेकरी कुमार वाघमोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की.

हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या पाडळी रोडवरील वीट भट्टी जवळ कुमार वाघमोडे हा पत्नीसह राहत आहे. याच परिसरात अमीर करीम मुल्ला हा सुद्धा राहत होता. मुल्ला याचे तळ्याजवळ मटन शॉप आहे. दीड वर्षांपूर्वी मयत अमीर याचे आणि संशयित कुमार वाघमोडे याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून वाद होऊन तो पेठवडगाव पोलीस ठाण्यामध्ये मिटवण्यात आला होता. कुमार वाघमोडे डूक धरून होता.नेहमीप्रमाणे कुमार वाघमोडे आज आंबेडकर नगर परिसरात शेळ्या चरवण्यासाठी गेला होता. यावेळी अमीर मुल्ला आणि त्याची समोरासमोर भेट झाली पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाला. रागाच्या भरात वाघमोडे यांनी अमीर मुल्ला यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच पेटवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत मुल्ला याला पुढील प्रक्रियेसाठी सीपीआर मध्ये पाठवण्यात आले.या घटनेनंतर वाघमोडे फरार झाला होता पण पेठवडगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

0 Comments