Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी.

 भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

रणजितसिंह ठाकूर 

-------------------------------

 "जियो और जिने दो" "जुडो और जुडाओ" या घोषणे सह शहरात आज दी.21 एप्रील रोजि भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पालखीवर सजवलेल्या महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक सकाळी 10 वा भगवान महावीर मंदिरातून निघालेली मिरवणूक मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात पोहोचली व

अभिषेक करण्यात आला. मिरवणूक अष्टभुजा देवी आसन गल्ली छत्रपती शिवाजी चौक, नवीन सराफा लाईन, चांदणी चौक, जुनी सराफा लाईन मार्गे ही मिरवणूक जैन मंदिरात पोहचली व तेथे अभिषेक झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी मिरवणुकीत जैन धर्मातील सर्व पुरुषांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भक्तिगीते आणि देशभक्तीपर गीतांवर भाविक नाचताना दिसत होते. यामध्ये महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments