बोरवडेत उजव्या कॅनॉलवरील पुल कोसळला; पर्यायी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा.
बोरवडेत उजव्या कॅनॉलवरील पुल कोसळला; पर्यायी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
बोरवडे प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------
कागल तालुक्यातील बोरवडे येथील काळम्मावाडीच्या उजव्या कॅनॉल वरील पुल आज सकाळी कोसळला. दोन वर्षांपासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्याने पुल धोकादायक बनला होता. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर हा पूल ढासळला.
यामुळे डोंगरभागाकडे जाणारा मार्गच बंद झाल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा होणार आहे. या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पुल उभारावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
काळम्मावाडी उजवा कॅनॉलवर बोरवडेजवळ शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तीस वर्षांपूर्वी पुल उभारला होता. हा पुल पाण्याच्या माऱ्यामुळे तळातून जीर्ण झाला होता. पुलाच्या पिलेरला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या. याबाबत बोरवडे गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे वारंवार लेखी तक्रार केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. रविवारी सकाळी काही शेतकरी या पुलावरून कालव्याच्या पलीकडे गेले मात्र परत येताना फुल कालव्यात कोसळला असल्याचे दिसले. याच दरम्यान एक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या पुलावरून येत होता याचवेळी हा पूल कोसळला मात्र दैव बलवत तर म्हणून मोठी दुर्घटना टळली.
या भागात परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती कालव्याच्या पलीकडे असल्याने शेतकऱ्यांना या पुलावरुनच वाहतुक करावी लागते. कॅनॉलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेतीचे क्षेत्र आहे. त्यामुळे गळित हंगामात या पुलावरुन ऊसाची वाहतुक सुरु असते. तर शेती मशागत साठी हा एकमेव पूल या कालव्यावर आहे. मात्र आता तो कोसळल्याने शेताकडे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तात्काळ पाटबंधारे विभागाने या ठिकाणी नवीन फुल उभारावा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
कालव्यावरील पूल पडल्याची माहिती गावात कळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाचे काम आठ दिवसात झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment