Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा शहरात वानराचा हैदोस ; पुन्हा एकाला वानराने घेतला चावा

 लोहा शहरात वानराचा हैदोस ; पुन्हा एकाला वानराने घेतला चावा .


--------------------------------------------------

लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार 

--------------------------------------------------

             शहरातील मानवी वस्तीत मागील कांहीं कालावधी पासून वानरांचा मुक्त संचार असून गत दोन महिन्यांत वानराच्या हल्यात साठ ते सत्तर नागरिक सापडले. रस्त्याने चालणाऱ्याच्या अंगावर पाठीमागून उडी मारणे, दुचाकी वरील स्वाराच्या अंगावर उडी मारणे असा प्रकार सुरू असून त्यामुळे अनेकजण जखमी झाले आता तर चक्क वानर दिसेल त्याला चावत असल्याने नागरिक भयभीत झाले असून दोन महिन्यांपासून वन विभाग सदर गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अंगणात फेरफटका मारत असलेल्या तरुणावर सदर वानराने हल्ला चढवीत पायाची फेंडरी फोडून गंभीर जखमी केल्याची घटना दि. १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता घडली.

               तीव्र उन्हाळ्यामुळे जंगलातील जलसाठे कोरडेठाक पडले असून जंगलात वन्य प्राण्यांना खाद्य देखील मिळत नसल्यामुळे मागील जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांपासून वानर जंगल भाग सोडून मानवी वस्ती मध्ये शिरकाव करत आहेत. पत्र्याच्या घरावर उडी मारणे, छतावर वाळण टाकलेले पापडी, शेवाई, चना, भुईमूग शेंगा खाऊन नासधूस करत आहेत. कुणी अडवण्यासाठी गेल्यास वानर त्यावर धावून जात असल्याने सर्वसामान्य नागरिक, महिला यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली असून नागरिक भयभीत झाले आहेत. मागील २० फेब्रुवारी रोजी इंदिरा नगर परिसरातील गुरुकृपा शाळे लगत राहणाऱ्या कुटुंबातील आठ वर्षीय बालकाला शरीरावर तीन ठिकाणी कडाडून चावा घेतल्याने सदरील मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सातत्याने अनेकांना सदर वानराने चावा घेतला तर कांहीं पादचारी, दुचाकीस्वार यांच्या अंगावर पाठीमागून उडी मारून त्यांना पाडले. त्यात अनेकजण गंभीर जखमी झाले.

            शहरातील बीडवई नगर भागातील आलोक अरुण मिसाळ हा तरुण दि. १४ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास जेवण करून अंगणात शत पावली करत असताना अचानक वानर आले आणि डाव्या पायाच्या फेंडरीला कडाडून चावा घेवून रक्त बंबाळ केले. त्यास तत्काळ लोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर नांदेडला हलविले. घटनेची माहिती मिळाल्या नंतर वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक ठाकुर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे, वनपरिमंडळ अधिकारी क्यादरवाड, वनरक्षक पी आर घुगे, वनसेवक नारायण शेवडीकर, नरसिंग बगाडे आदींनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

            वानराच्या मर्कट लीलानी शहर वाशिय त्रस्त झाले असून वानर लहान मुलांसह मोठ्या व्यक्तीवर देखील हल्ला करत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

       ▪️ हल्लेखोर वानररास पकडण्यासाठी वनविभागाकडून सापळा लावला असून सदर वानर उद्यापर्यंत सापळ्यात अडकलेे नसल्यास दोन दिवसात प्रशिक्षित वनविभागाचे कर्मचारी बोलावण्यात येणार असल्याचे वनरक्षक पी. आर. घुगे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments