Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेता लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील 14 गुन्हेगार 48 तासांसाठी हद्दपार.

 लोकसभा निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेता लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील 14 गुन्हेगार 48 तासांसाठी हद्दपार.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा प्रतिनिधी 

वैभव शिंदे

--------------------------------------------

     लोकसभा निवडणुक 2024 अनुषंघाने लोणंद पोलीस स्टेशन हददीतील 14 गुन्हेगार तडीपार..

   त्याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुक 2024 चे अनुषंघाने श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्री राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांनी पोलीस ठाणे हददीत रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचेकडुन सार्वनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये या करीता गुन्हेगारांवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करणेबाबत लोणंद पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुशिल भोसले यांना आदेशित केले होते.

      त्याप्रमाणे सपोनि सुशिल भोसले यांनी लोणंद पोलीस स्टेशन हददीत रेकॉर्डवरील 14 गुन्हेगार यांचे हातुन निवडणुक काळात दखलपात्र अथवा अदखलपात्र स्वरुपाचा गंभीर अपराध होण्याची शक्यता असल्याचे ओळखुन त्यांचेकडुन सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता दिनांक 5/5/2024 रोजीचे 12.00 ते दिनांक 7/5/2024 रोजीचे रात्री 12.00 पर्यंत सीआरपीसी 144(2) प्रमाणे लोणंद पोलीस ठाणे कार्याक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करणेबाबत आदेश होणेकरीता प्रस्ताव मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी फलटण यांना पाठविला होता. त्याप्रमाणे मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी फलटण भाग यांनी 1) माणिक दत्तात्रय शेळके, 2) शुभम दिपक नरुटे, 3) दिपक बबन नरुटे, 4) निलेश विठठल रुपनवर, 5) उमेश विठठल रुपनवर, 6) विनोद नामदेव रुपनवर, 7) शुभम शरद कोकरे, 8) बाळु दिनकर नरुटे, 9) मच्छिंद्र एकनाथ जाधव, 10) अमोल कांतीलाल शेळके, 11) संतोष कांतीलाल शेळके, 12) विराज नामदेव धुमाळ, 13) नामदेव गणपत धुमाळ, 14) तुषार ऊर्फ टिलु नामदेव धुमाळ सर्व रा. मिरेवाडी ता. फलटण जि. सातारा यांना सीआरपीसी 144(2) प्रमाणे दिनांक 5/5/2024 रोजीचे 12.00 ते दिनांक 7/5/2024 रोजीचे रात्री 12.00 पर्यंत लोणंद पोलीस ठाणे कार्याक्षेत्रात प्रवेश करणेस मनाई करण्यात आली आहे. तडीपार यांचा मतदानाचा हक्क आबाधित राखुन त्यांना मतदानादिवशी दुपारी 1.00 ते 4.00 पर्यंत मतदान केंद्रावर जावुन मतदान करणेकरीता शिथिलता देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments