सांगवडे तालुका करवीर येथील ग्रामदैवत श्री नरसिंह यांचा जन्मकाळ मंगळवार दिनांक 21 रोजी सायंकाळी 6 वा. 50 मि. होणार संपन्न.
सांगवडे तालुका करवीर येथील ग्रामदैवत श्री नरसिंह यांचा जन्मकाळ मंगळवार दिनांक 21 रोजी सायंकाळी 6 वा. 50 मि. होणार संपन्न.
-------------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी/- सांगवडे तालुका करवीर येथील ग्रामदैवत श्री नरसिंह यांचा जन्मकाळ मंगळवार दिनांक 21 रोजी सायंकाळी 6 वा. 50 मि. संपन्न होणार आहे. त्यानंतर भव्य असा पालखी सोहळा पार पडणार आहे.
तसेच पालखी सोहळा झाल्यानंतर भजन, कीर्तन आणि जागर अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नरसिंह मंदिर कमिटी, श्री विठ्ठल मंदिर सेवाधारी, ग्रामस्थ, समस्त पुजारी गुरव ,रावळ समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्री सद्गुरु आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने श्री ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताह करण्याचे आयोजन केले आहे.
ह भ प ईश्वर लोकरे मोरेवाडी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पारायण सुरू आहे. श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवार दिनांक 22 रोजी होणार आहे. तसेच बुधवारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
Comments
Post a Comment