गांधीनगरसह करवीर पूर्व भागात 67 टक्के मतदान.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------
गांधीनगर:- गांधीनगरसह करवीर पूर्व भागात गडमुडशिंगी, वळिवडे, चिंचवाड वसगडे, न्यू वाडदे गावांमध्ये लोकसभेसाठी उत्साहात मतदान झाले. उन्हाचा तडाखा असूनदेखील मतदारांनी मोठ्या प्रमाणावर येऊन मतदान केले. अतिशय शांततेत आणि उत्साहाने मतदान झाले. या भागातील विविध मतदानकेंद्रांना आ. सतेज पाटील, माजी आ. अमल महाडिक, पृथ्वीराज पाटील आदिंनी भेटी दिल्या.
गांधीनगर व्यापारी पेठेत लोकसभेसाठी प्रथमच उस्फूर्तपणे नागरिकांनी मतदान केले. त्यामुळे गांधीनगर मध्ये प्रशासनाच्या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक मतदान केंद्रातील बुथवर चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र शांततेत मतदान झाले.
यावेळी गावनिहाय झालेली मतदानाची आकडेवारी गावाचे नांव एकूण मतदान झालेले मतदान आणि टक्केवारी याप्रमाणे
गांधीनगर - १११७५ - ७५२८ - ६७.३६%
गडमुडशिंगी - १०८०१ - ७५६१ - ७०.००%
वळिवडे - ७५१८ - ५८८६ - ७८.२९%
चिंचवाड - ४०५३ - ३२१६ - ७९.३४%
वसगडे ६४०२-४७५४-७४ २५/:
न्यू वाडदे १३०५-१०१८-७८/:
२) गांधीनगर येथे लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले.
0 Comments