लोकसभेच्या रणधुमाळी मध्ये प्रहार पक्षाची भूमिका तटस्थ.
लोकसभेच्या रणधुमाळी मध्ये प्रहार पक्षाची भूमिका तटस्थ.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------
सांगली. जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची मोठी ताकद असून जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू हे जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत कोणत्याही राजकीय किंवा अपक्ष कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलेला नाही तरी कोणत्याही उमेदवाराने प्रहार पक्षाचा पाठिंबा आहे असे घोषित करू नये असे आव्हान प्रहार पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांनी केले आहे
प्रहार जनशक्ती पक्ष जरी महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून असला तरी महाराष्ट्र मध्ये कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये प्रहारच्या सर्व पदाधिकारी यांच्या विचाराने व बच्चुभाऊं यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये कोणालाही पाठिंबा न देणे असे घोषित केले आहे तरी जोपर्यंत बच्चुभाऊ हे आदेश देत नाहीत तोपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये प्रहार पक्ष तटस्थ राहण्याची भूमिकेत आहे असे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे
Comments
Post a Comment