Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कासवगती अनेक कामे अर्धवट अवस्थेत.पावसाळ्यात ठरणार डोकेदुखी.

 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कासवगती अनेक कामे अर्धवट अवस्थेत.पावसाळ्यात ठरणार डोकेदुखी.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड  प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

----------------------------

 ता.12: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सूरू असलेले अनेक रस्त्यांची कामे संथपणे कासवगतीने सुरू आहेत. परिणामी पावसाळा तोंडावर आल्याने सदर कामे अर्धवट अवस्थेत पडून राहिल्यास संबंधित गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. 

     राज्यातील ज्या वाड्या- वस्त्या जोडण्यासाठीची रस्त्यांची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुर होऊ शकत नाहीत. व सद्य स्थितीत अस्तित्वात असलेल्या परंतू दुरावस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी सन २०१५ साली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजना सन२०१९-२० पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. मात्र संनियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेच्या उदासिन धोरणामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे कासवगतीने सुरु आहेत. परिणामी सन २०२४ अर्धे संपत आले आहे तरीसुध्दा योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. तथापि तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असल्यामुळे अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यामुळे सदर कामे अर्धवट अवस्थेत पडून राहण्याची भीती संबंधित गावातील लोक व्यक्त करीत आहेत. तद्वतच ज्या रस्त्यांच्या कडेला केवळ मातीचा भराव टाकून झाला आहे मात्र पुढचे काम अर्धवट राहिले तर संबंधित गावकऱ्यांसाठी ही बाब खुप मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे सर्वसामान्य जनता बोलत आहे. तालुक्यातील रिसोड ते गणेशपुर, पाचंबा हा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता दर्जोन्नती करण्यासाठी सन २०१९-२० मधे मंजूर झाला होता. परंतु मध्यंतरी काही कारणास्तव सदर काम ठप्प झाले होते. मात्र २०२३ मधे रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. तेंव्हा पासून आजतागायत गणेशपुर पर्यंत केवळ बीबीएमचे काम झाले आहे.तर उर्वरित गणेशपुर पासून पाचंब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीतील काळीमातीने रस्त्याच्या कडेला भराव टाकण्यात आला आहे. कदाचित पावसाळा वेळेत सुरू झाला, तर पाचंबा आणि गणेशपुर येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी त्रासदायक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशीच अवस्था खडकी, चाकोली, वरूड,पेनबोरी, बोरखेडी ते मोप, शेलुखडसे, वाकद आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची असल्याचे बोलले जात आहे. सदर कामे अशीच कासवगतीने सुरू राहिल्यास २०२५ पर्यंत सुद्धा पुर्ण होतील की नाही अशी शंका संबंधित गावातील लोक व्यक्त करीत असून, या गंभीर बाबीकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. 


प्रतिक्रीया 

" उपरोक्त कामांसाठी जवळपास सात, आठ गावातील सरपंच, उपसरपंच व गावकरी मिळून आम्ही सुमारे पन्नास लोकांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तेंव्हा कुठे सदर कामे कार्यान्वित झाली. मात्र काम असेच संथ गतीने सुरू राहिले तर पूर्वीपेक्षा जास्त त्रासदायक होईल. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम पुर्ण व्हावे अशी अपेक्षा आहे." 

      ____ विष्णु बळीराम जाधव.

  ( सचिव, सरपंच संघटना ता. रिसोड)

Post a Comment

0 Comments