कौलव येथे युनियन तरूण मंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
कौलव येथे युनियन तरूण मंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
---------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
---------------------------
कौलव येथे मंगळवार दि १४/५/२४रोजी युनियन तरूण मंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार असुन, संध्याकाळी ६ वा मिरवणुकीचे आयोजन केले असून या मिरवणुकीसाठी कोल्हापुरमधील महाराष्ट्र गर्जना ढोल ताशा पथक आणि चिंतामणी लाईट राधानगरीवाले यांची आकर्षक विद्युत रोषणाई खास आकर्षण आहे .
मंडळाची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असुन मंडळाची स्थापना २६ जानेवारी १९७६ला स्थापना झाली आहे मंडळाच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जातो अनेक गरीब गरजू लोकांना आधार देण्याचे काम मंडळाने केले आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती,रक्तदान शिबिर, नेत्रदान संकल्पना, आरोग्य शिबीर,हालते देखावे, सामाजिक प्रबोधनाचे सजीव देखावे, हळदी कुंकू समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना मदत असे सामाजिक उपक्रम कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना स्वकष्टाने, श्रमदानातून चालवलेले आहेत
Comments
Post a Comment