Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी आत्महत्या मुक्तीसाठी ग्राम समीतीने प्राधान्याने काम करावे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांचे रिसोड येथील मेळाव्यात मार्गदर्शन.

 शेतकरी आत्महत्या मुक्तीसाठी ग्राम समीतीने प्राधान्याने काम करावे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांचे रिसोड येथील मेळाव्यात मार्गदर्शन.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

----------------------------------

वाशिम जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त मुक्त करणे बालविवाह रोखणे याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले आहे. त्या काल दि 13 मे रोजी दुपारी येथील तहसील कार्यालय सभागृहामध्ये आयोजित शेतकरी आत्महत्त्या मुक्त जिल्हा अभियान, शेतकरी आत्मबळ प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बालविवाह साठी नेहमी मुलींना दोष देण्यात येत असतो मात्र दोष फक्त मुलींचाच नसतो तर मुली ह्या दबावाच्या ओझ्याखाली किंवा लालसेपोटी बालविवाह करत असतात. 18 वर्षे वय झाल्यानंतरच मुलींचा विवाह करावा कारण ती 18 वर्षे वय झाल्यानंतर ती लग्नास योग्य होते व संसारासाठी तिची मानसिकता व शरीर दृढता निर्माण झालेले असते. बालविवाह रोखण्यासाठी सर्व स्तरावरून सामान्य नागरिकांनी सुद्धा प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे यासाठी *१०९८* हा टोल फ्री क्रमांक शासनाने जारी केला असून यावर कोणीही बालविवाहासाठी तक्रार करू शकतो. यासाठी संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येतात. येणाऱ्या काळात वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्या व बालविवाह यासाठी निरंक राहणार आहे करण प्रशासनाकडून यासाठी विविध उपाय योजना आखलेल्या असून सर्वाच्या सहकार्याने हे शक्य होऊ शकते.जिल्ह्यातील शेतकरी विविध आडचणीचा सामना करतांनी अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्त्या सारखा मनाला वेदना देणारा मार्ग अवलंबीला असून यामध्ये अनेक शेतकरी कुटुंबाची वाताहत झालेली आहे. आशा बिकट परिस्थितीतुन धेर्याच्या मार्गाचा सामना करणा-या शेतकरी कुटुंबांना आत्मबळ प्रशिक्षणाचे आयोजन वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या संकल्पनेतुन रिसोड तहसील कार्यालयामध्ये 13 मे रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले. या आत्मबळ प्रशिक्षणा मध्ये मनोविकारतज्ज्ञ डाॅ.श्वेता मोरवाल ह्या शेतकरी आणि आत्मबळ उन्नती, शेती उत्पादन खर्च कमी करणे या विषयावर जैविक शेतीचे प्रशिक्षक संजय मांडवगडे मार्ग दर्शन केले. तर पिक पध्दती या विषयावर रिसोड तालुका कृषी अधिकारी मदन तावरे यांनी मार्गदर्शन केले.पिक कर्ज व्याजमाफी, पुनर्गठण योजने संदर्भात शेतक-यांना मार्गदर्शन स्टेट बॅंक चे शाखा व्यवस्थापक राहुल बारापात्रे, शेती संबंधित कौशल्य विकास यावर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीमती सिमा खिरोडकर, बालविवाह प्रतिबंध उपाययोजना या विषयावर कायदा तथा परिवीक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास प्रमोद बदरखे, निवासी नायब तहसीलदार डॉ.बाळासाहेब दराडे, महिला बालविकास अधिकारी अमिता गिरे, नायब तहसीलदार डी,टी, कुळमेथे,यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,पोलीस पाटील, तलाठी, अंगणवाडी अंगणवाडी सेविका,, शेतकरी आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिसोड तहसीलचे मंडळ अधिकारी,तलाठी व महसूल चे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन तलाठी शिवकन्या कोतीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन निवासी नायब तहसीलदार डॉ. बाळासाहेब दराडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments