शेतातील अखाड्यावर उभा असलेला ट्रॅक्टर नांगरासह चोरट्यांनी केला लंपास ; लोहा पोलिसात गुन्हा दाखल.
शेतातील अखाड्यावर उभा असलेला ट्रॅक्टर नांगरासह चोरट्यांनी केला लंपास ; लोहा पोलिसात गुन्हा दाखल.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
----------------------------
सद्यस्थितीस शेती मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात असून कांहीं बळीराजा बैलाद्वारे तर कांहीं ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. मे महिना मध्यान्ह वर असताना अवकाळी मुळे शेती मशागतीच्या कामात कांहीं प्रमाणात अडथळा येत असला तरी मशागतीचे कामे जोरदार सुरू आहेत. शेतीतील नांगरटीचे कामे करून ट्रॅक्टर अखाड्यावर उभे करून घरी गेलेल्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर नांगरासह अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना घडली. सदरील घटनेप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून वीस दिवस उलटल्यानंतर देखील चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध लागला नसल्याने ट्रॅक्टर मालक बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे.
तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी उध्दव बालाजी किरवले यांनी दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान स्वतःच्या शेतात दिवसभर ट्रॅक्टरद्वारे नांगरटीचे काम करून सायंकाळी कारेगाव शिवारातील अखाड्यावर नांगर जोडलेला ट्रॅक्टर क्र. एम एच २६ बी सी ६९४० उभा करून किरवले हे जेवणासाठी घरी जाऊन परत रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास अखाड्यावर आले असता त्यांना ट्रॅक्टर दिसून आले नाही. सदर ट्रॅक्टर कुणीतरी पळवून घेवून गेल्याचे आढळून आले. आजुबाजूस चौकशी केली मात्र ट्रॅक्टरचा तपास लागला नाही. एकूण ६ लाख ७ हजार किमतीचे ट्रॅक्टर आणि नांगर अज्ञाताने चोरल्या प्रकरणी उध्दव किरवले यांनी लोहा पोलिसात तक्रार दाखल केली. सदर घटनेप्रकरणी लोहा पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस जमादार दीपक गोविंद किरपणे हे करीत आहेत.
Comments
Post a Comment