अवचित पीर तालीम मंडळाची गेली पन्नास वर्षाची शिवज्योत परंपरा कायम.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापुर प्रतिनिधी
रोहन कांबळे
--------------------------------
कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील अवचित पीर तालीम मंडळ
या तालमीच्या माध्यमातून
पन्नास ५० वर्षाहून अधिक पूर्वीपासून शिवजयंती निमित्त
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावरून पायी शिवज्योत आणली जाते.महाराष्ट्रातले बऱ्यापैकी निम्म्याहून अधिक प्रमुख किल्ल्यावरून तालमीच्या वतीने शिवज्योत आजपर्यँत आणली आहे. यावर्षी देखील सालाबाद प्रमाणे राधानगरी तालुक्यातील ‘शिवगड' या किल्ल्यावरून तालमीची शिवज्योत शिवछत्रपतींच्या जयघोषात पाई आणली.
यावेळी तालमीच्या हजारो मावळ्यांसह शिवज्योत आणली.यावेळी तालमीचे अध्यक्ष मंजित माने, उपाध्यक्ष दीपक माने, संग्राम साळोखे, अजित शिंदे, रणजित पाटील, सुजित चव्हाण, विक्रम साळोखे, निवास शिंदे, स्वप्नील चौगुले,सोनू चव्हाण,अमित चव्हाण,तुषार इंगवले यांच्यासोबत अनेक मावळे उपस्थित होते.
0 Comments