आणि त्या शिवभक्तांनीकुरणी बंधारा प्रदुषणमुक्त केला.
आणि त्या शिवभक्तांनीकुरणी बंधारा प्रदुषणमुक्त केला.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
मुरगूड/ प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
--------------------------------------
मुरगूड जवळ च्या कु रणी बंधाऱ्या जवळ वेद गंगेला
मिळणाऱ्या ओढ्यात अगदी तोंडावर टाकाऊ बाटल्यांचा ढीग.
पाण्याच्या,औषधाच्या,कीटक नाशकांच्या अशा नाना तऱ्हेच्या बाटल्या होत्या.
शिवभक्त स्वयंसेवकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी प्रथम नगरपरिषदेच्या कचरा गाडीला कळवले.
कडक उन्हाळा. निदान पिण्याच्या पाण्याची टंचाई येऊ नये म्हणून नगरपरिषद नेहमी दक्ष असते.सर पिराजी तलाव व वेद गंगेच्या पाण्यावर शहराची तहान भागवली जाते.तलाव पातळी खाली गेल्याने मे महिन्यात वेदगंगा पात्रातून पाणी पुरवठा होतो.
नेमके हेच पिण्याचे पाणी कचरायुक्त सांडपाण्याचे प्रदूषित होत आहे.
शिवभक्त स्वयंसेवक व नगरपरिषदेच्या स्वच्छता कामगार यांनी भल्या सकाळी कामाला सुरुवात केली.
सरपटणारे जीव, डास यांची कसलीही पर्वा न करता ट्रक भर गाळ बाहेर काढला आणि वेदगंगेला प्रदूषण मुक्त केले.
गाळ काढून नदी प्रदूषण मुक्त करणाऱ्या युवक व कामगाराचे कौतुक होत आहे.
सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट व नगरपरिषेच्या स्वच्छता विभागाचे मुकादम बबन बारदेस्कर यांनी पुढाकार घेतला.त्यांना भिकाजी कांबळे,मोहन कांबळे,ओंकार पोतदार,राजू कांबळे,दत्ता बरकाळे,सातापा कांबळे,दिलीप पाटील,किसन कांबळे,विक्रम कांबळे इत्यादींनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment