रिसोड शहरात पाण्याचा अपव्यय, पाणी टंचाईच्या काळात नागरिकांचे बेजबाबदार वर्तन.

रिसोड शहरात पाण्याचा अपव्यय, पाणी टंचाईच्या काळात नागरिकांचे बेजबाबदार वर्तन.

--------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

 रिसोड/प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

--------------------------------

-रिसोड शहर पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर पोहचले असताना पाण्याचा वापर अतिशय जबाबदारीने करणे ही काळाची गरज बनली आहे परंतु शहरातील काही बेजबाबदार नागरिक नळाचे पाणी रस्ता धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी, नाली स्वच्छ करण्यासाठी बेदिक्कतपणे वापरत आहेत. आशा नळधारकांवर ताबडतोब कारवाई करून त्यांचे नळ कनेक्शन बंद करावे जणेकरून पाणीही वाचेल आणि त्यांना पाण्याचे कळेल आणि पाण्याचा अपव्ययही थांबेल. नगर परिषद प्रशासन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण शहराला तीन दिवस आड करून पाणीपुरवठा करित आहेत.पाणी पुरवठा कर्मचारी विनोद बांगर एक दिवस आधीच कोणत्या भागात व कोणत्या वेळेत पाणीपुरवठा होणार आहे याची माहिती व्हाट्सअप च्या माध्यमातून देतात एवढेच नव्हे तर पाणी सोडण्यापूर्वी काही मिनिट अगोदर संबंधित भागातील लोकांना पाणी सोडल्याची सूचना करतात त्यामुळे रिसोड शहरातील नागरिक नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनावर समाधान व्यक्त करतात.ज्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो तेथे केवळ एक महिना पुरेल एवढा म्हणजे 20%पेक्षा कमी जलसाठा उपलब्ध आहे.पाणी योग्य. पद्धतीने वापरले तर जलसाठा एक ते दीड महिना पुरेल परंतु पावसाळा उशिरा सुरु झाला तर त्यापुढे धारणात. पाणी राहणार नाही त्यामुळे जो कोणी पाण्याचा दुरुपयोग करतानी दिसला तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.