Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यामध्ये वेदगंगा नदीत बुडून चौघांचा दुर्देवी मृत्यू !

 कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यामध्ये वेदगंगा नदीत बुडून चौघांचा दुर्देवी मृत्यू !


--------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

मुरगूड/ प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

--------------------------

कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यामध्ये वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.


यामधे जितेंद्र विलास लोकरे (वय ३६, रा. मुरगूड), रेश्मा दिलीप यळमल्ले ( वय ३४ रा. अथणी कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय 27, रा. रुकडी) या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलंय, तर हर्ष दिलीप यळमल्ले (वय १७, रा. अथणी) याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. यामध्ये जितेंद्र विलास लोकरे यांची बहिण, बहिणीची मुलगी आणि मामाच्या मुलीचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments