समता नायक महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त रिसोड येथे पर्यावरणपूरक पळसपान पत्रावळी कार्यक्रमाचे आयोजन
समता नायक महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त रिसोड येथे पर्यावरणपूरक पळसपान पत्रावळी कार्यक्रमाचे आयोजन.
---------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर.
---------------------------------
सद्धस्थितीत वायु,जल आणि जमीन प्रदुषणाकरिता अनेक नवनिर्मित रासायनिक घटकापैकी प्लॅस्टिक , थर्माकोल तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थ हे घटक कारणीभूत आहेत असे म्हणणे वावगे होणार नाही.वर्तमान काळामध्ये कमीत-कमी 20 टक्के जनसंख्या कोणत्यातरी एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहे आणि प्लॅस्टिकचा असाचं सर्रास उपयोग होत राहिला तर हे प्रमाण केव्हा 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडेल हे कळणार सुध्दा नाही असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे ह्यांनी आसन गल्ली स्थित जगन्नाथ मुलंगे यांच्या राहत्या घरी समता नायक महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित पर्यावरणपूरक पळसपान पत्रावळी कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता अविनाश सहातोंडे अध्यक्ष रिसोड तालुका वकिल संघटना,दिनकर कानडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ तालुका रिसोड,विष्णु जटाळे वनपाल सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र रिसोड,अरूण पडवे मंडळ अधिकारी तहसिल कार्यालय रिसोड , सचिन गांजरे अध्यक्ष जय लखमा डी.एम.एल.टी. कॉलेज रिसोड ,वृक्षप्रेमी सिमा घळे ईटोलीकर प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे महत्व विशद करतांना मुलंगे म्हणाले कि,कोणत्याही प्रकारचा कागद किंवा चहाचा कागदी कप रासायनिक पदार्थांशिवाय तयार होत नाहीत.आणि साधारणतः पत्रावळीवर जेवणास कोणत्याही व्यक्तीला अर्धा तास लागतो.त्यामुळे पत्रावळीची जाडी व मजबूती करीता पत्रावळी च्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारच्या मेणाचा थर चढवल्या जातो कि,जो गरम खाद्यपदार्था सोबत वितळून अन्न सेवना सोबत पोटामध्ये शिरून दुर्धर रोगास आमंत्रित करतो असे आरोग्य विभागाशी संबंधित तज्ञांचे मत आहे,याऊलट पळस,मोह,टेंभुर्णी,वड,कमळ इत्यादि वनस्पतींच्या पानातील रस अन्नामध्ये मिसळुन शरिर निरोगी ठेवण्यास मदत करते.दुसरी बाब म्हणजे जेव्हापासून कागदि पत्रावळीचे प्रचलन सुरू झाले तेव्हापासुन अनेक गरिब मजुरांचा रोजगार हिरावल्या गेला.आपण जर छोट्या- मोठ्या कार्यक्रमाकरिता नैसर्गिक पत्रावळीचा उपयोग केला तर अनेक मजुरांना रोजगार तर मिळेलचं याशिवाय अनेक दुर्धर रोगापासून मानवाची मुक्तता होईल,यामध्ये तिळमात्र शंका नाही.ह्या प्रसंगी निसर्ग प्रेमी शंकर थोरात,जनार्धन जहिरव,सौ.कावेरी मुलंगे,टोलुआण्णा,यांच्याकडुन तयार करण्यात आलेल्या पळसपान पत्रावळीचे ऊपस्थितामध्ये वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दिव्या बरडे,विनय बरडे,श्रावणी बरडे,श्रध्दा बरडे,गणेश घोडेकर,गायत्री गांजरे,सोमनाथ काळे ईत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.
Comments
Post a Comment