Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वळीवडे उचगाव व गडमुडशिंगी येथील धोकादायक विनापरवाना व बेकायदेशीर होडींग लावणाऱ्या संबंधित दुकान मालक जाहिराती कंपनी व ठेकेदारावर कारवाई करा .राजू कांबळे.

 वळीवडे उचगाव व गडमुडशिंगी येथील धोकादायक विनापरवाना व बेकायदेशीर होडींग लावणाऱ्या संबंधित दुकान मालक जाहिराती कंपनी व ठेकेदारावर कारवाई करा .राजू कांबळे.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-------------------------------

   करवीर तालुक्यातील. उचगाव गडमुडशिंगी व वळीवडे या गावच्या हद्दीत काही संबंधित जाहिरात ठेकेदाराने विनापरवाना व बेकायदेशीर जाहिरातीचे होडींग लावले आहे. ते सध्या नागरिकांच्या जीवावर बेतण्याच्या परिस्थितीत आहेत. सध्या घाटकोपर येथे घडलेल्या होडींग दुर्घटनेत निष्पाप 14 जणांचा बळी गेला आहे तशीच या गावातील होडींग मुळे अशी दुर्घटना पुन्हा घडू शकते त्यामुळे संबंधित प्रशासनाने अशी धोकादायक रित्या उभी असलेले होर्डिंग तात्काळ काढून बेकायदेशीर व विनापरवाना उभी केलेल्या वर कायदेशीर कारवाई व्हावी. तसे न झाल्यास भविष्यात अशी होडींग दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत जाहिराती ठेकेदार व दुकान मालका वर राहील दरम्यान गावच्या हद्दीत धोकादायक असणारी सर्व होडींग काढून टाकावीत अन्यथा आपल्या प्रशासनाच्या दारात दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल अशा प्रकारचे निवेदन दलीत महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे उपाध्यक्ष अनिल हेगडे यांनी पंचायत समिती करवीर, सरपंच ग्रामसेवक वळीवडे गडमुडशिगी उचगाव यांना दिले असून तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला

Post a Comment

0 Comments