Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ट्रॅव्हलिंग टेस्ट आता खाजगी संस्थेच्या हाती कोल्हापूर सांगली अनेक मोटर ट्रेनिंग स्कूल वाले होणार माला माल

 ट्रॅव्हलिंग टेस्ट आता खाजगी संस्थेच्या हाती कोल्हापूर सांगली अनेक मोटर ट्रेनिंग स्कूल वाले होणार माला माल.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी

 राजू कदम

------------------------------------

कोल्हापूर. चेक पोस्ट वाहनांच्या स्क्रॅप स्मार्ट कार्डचा अप्रत्यक्ष खाजगीकरणानंतर ड्रायव्हिंग टेस्ट ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थांना येत्या 1 जून पासून देण्याची शक्यता आहे.

मात्र त्यासाठी मेट्रो शहरासह कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात संबंधित संस्थांकडे एक आणि दोन एकर जागा उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.

एखाद्या प्रशिक्षण संस्थेने ही जागा उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूर सांगली सातारा आणि कराड शहरातील 500 हून अधिक मोटार ड्रायव्हिंग स्कूल वर संक्रांत कोसळणार आहे

भांडवलदाराच ड्रायव्हिंग टेस्टचे मालक होणार आहेत.


वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते परंतु आता आरटीओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतच ही टेस्ट देता येणार आहे

त्यासाठी ठराविक संस्थांना त्या मान्यता देण्यात येणार आहेत

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून येत्या एक जून पासून नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे.

मात्र ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान आवश्यक असलेल्या नियमांचे परिपूर्ती कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात होणे शक्य नाही कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात कोल्हापूर सांगली सातारा आणि कराड या शहराचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments