Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वसगडे ग्राम तलावाची दुरावस्था खुरट्या वनस्पती, प्लास्टिक कचऱ्यांनी व्यापला तलाव.

 वसगडे ग्राम तलावाची दुरावस्था खुरट्या वनस्पती, प्लास्टिक कचऱ्यांनी व्यापला तलाव.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

------------------------------------

संरक्षक भिंतीचा अभाव

ग्रामपंचायत प्रशासन , लोकप्रतिनिधी, आणि ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष.

गांधीनगर:- वसगडे ता.करवीर येथील ग्राम तलावाची दुरावस्था झाली असून तलावात खुरट्या वनस्पती, प्लास्टिक कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणामुळे जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत प्रशासन करतय तरी काय असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.


वसगडे गावाच्या ग्राम तलावात थेट नदीतून पाण्याची पाईपलाईन केल्यामुळे बाराही महिने तलावात मुबलक पाणी असते. पण त्या तलावाची सध्या अवस्था दयनीय झाली आहे. तलावाच्या सभोवती संरक्षक भिंतीचा आभाव आहे .त्यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांना या तलावाचा मोठा आधार असला तरी तो दूषित होऊ पाहत आहे. तलावात खुरट्या वनस्पती, प्लास्टिकचा कचरा यांचे प्रमाण वाढल्याने तलावातील जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावातील पाण्याला हिरवा गर्द रंग आल्यामुळे हे पाणी दुर्गंधीयुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लोकप्रतिनिधी, आणि संबंधित ठेकेदार आपापल्या सोयीच्या राजकारणात व्यस्त आहेत. पण गावचे वैभव असणारे तलाव मात्र नरक यातना भोगत आहे. लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतप्रशासन यांनी लोकसहभागातून उपाययोजना केल्या तर ग्राम तलावाचे गतवैभव पुन्हा एकदा खुलणार आहे. सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


चौकट 1) गावच्या ग्राम तलावाचे टेंडर मच्छीमारांना दिले जाते. त्यांच्याकडेच तलावाची देखभाल करण्याची जबाबदारी असते. पण गेल्या काही दिवसापासून त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित ठेकेदाराला याविषयी सूचना केली जाईल आणि ग्रामपंचायत प्रशासन ग्राम तलाव स्वच्छतेसाठी प्रयत्न करेल. 


योगिता बागडी (सरपंच वसगडे)


2) ग्राम तलावाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची आहे. प्रत्येक वर्षी तलावातील मच्छीमारीचा ठेका दिला जातो. तो निधी ग्राम तलावाच्या स्वच्छतेसाठी आणि संवर्धनासाठी वापरण्याची गरज आहे.

राजेंद्र कोळी (सहसचिव- को.जि. कोळी समाज विकास मंडळ)

फोटो ओळ - वसगडे ता.करवीर येथील ग्राम तलावाची दुरावस्था झाली आहे. खुरट्या वनस्पती व प्लास्टिक कचऱ्यामुळे अस्तित्व धोक्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments