Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भांडणाचा राग मनात धरून मुलग्याने केला वडिलांचा खून केळशी येथील घटना आरोपीवर गुन्हा दाखल.

 भांडणाचा राग मनात धरून मुलग्याने केला वडिलांचा खून केळशी येथील घटना आरोपीवर  गुन्हा दाखल.

राधानगरी तालुक्यातील केळोशी येथील भांडणा चा राग मनात धरून मुलग्याने वडिलांचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली असून आरोपीवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिले


याबाबत अधिक माहिती अशी की केळोशी येथील तुकाराम  मगर वर्षे 65 यांचा मुलगा प्रकाश तुकाराम मगर या बापलेकांचे दोन दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती त्यावेळी बाप व मुलगा हे दोघे एकमेकाचा खून करणार अशी धमकी देत होते आज सकाळी प्रकाशाने वडील शेतामध्ये गेले असल्याचे पाहून प्रकाशाने तुकाराम याचा दोरीने गळा आवळून खून केला असून याबाबतची  आकाश आनंदा मगर याने राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली 

या प्रकरणी प्रकाश मगर याच्यावर राधानगरी पोलिसांनी 302 या कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर हे करत आहेत

Post a Comment

0 Comments