Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

करेकुंडीत पाझर तलावात बुडून दोन शाळकरी मुलींसह तिघांचा मृत्यू.

 करेकुंडीत पाझर तलावात बुडून दोन शाळकरी मुलींसह तिघांचा मृत्यू.

--------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी 

आशिष पाटील

--------------------------------

             तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुली अशा तिघांचा बुडून मृत्यू झाला. करेकुंडी (ता. चंदगड) येथे सोमवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.


मिळालेल्या माहितनुसार, भर उन्हात करेकुंडीत शाळकरी मुली पोहायला गेल्या होत्या. दरम्यान दमछाक होऊन त्या पाण्यात बुडू लागल्या. त्यांना वाचवायला सेवानिवृत्त विजय विठोबा शिनोळकर (वय ४२) हे वाचवायला गेले. मात्र, त्यात चैतन्या नागोजी गावडे (१२, रा. आसगाव, ता. चंदगड) आणि समृद्धी अजय शिनोळकर (१०, रा. करेकुंडी, सध्या रा. वैताकवाडी) या दोन्ही मुलींसह तिघेही तलावात बुडाले.


सेवानिवृत्त जवान विजय शिनोळकर गावानजीकच्या पाझर तलावात मुलींसह पोहायला गेले होते. पोहताना दोन्ही मुलींची दमछाक झाली आणि त्या बुडाल्या. त्यांना वाचवताना विजय हेही बुडाले. दरम्यान, सायंकाळी तलावाच्या काठावर तिघांचे कपडे गावातील एकाला दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिन्ही मृतदेह ग्रामस्थांनी पाण्याबरोबर काढले. चैतन्या ही मामाच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी आली होती; तर विजय यांची पुतणी वैताकवाडीहून करेकुंडी येथे काकांच्या घरी राहायला आली होती. मृतदेह पाण्याबाहेर काढताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. बिजय यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments