Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मसलापेन सरपंचपदी सौ सुनीता वानरे अविरोध.

 मसलापेन सरपंचपदी सौ सुनीता वानरे अविरोध.

 --------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

 रिसोड  प्रतिनिधी 

  रणजीत ठाकूर

----------------------------------------------

रिसोड.तालुक्यातील केशवनगर येथून जवळच असलेल्या मसलापेन येथे सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली सरपंच सौ सुनिता संजय वानरे यांची अविरोध निवड झाली. मसलापेन येथील सदस्यची एकूण संख्या ९ असून मागील ३ वर्ष सौ शिल्पा शामा अंभोरे ह्या सरपंच पदी होत्या ठरल्याप्रमाणे पुढील २ वर्षा करीता सौ सुनिता संजय वानरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून रिसोड तहसीलचे श्री बाळासाहेब दराडे निवासी नायब तहसीदार, निवासी नायब तहसीदार कुळमेथे साहेब ,तलाठी उईके साहेब ,राहुल कांबळे साहेब ,माजी सरपंच सौ शिल्पा श्यामा अंभोरे , मसला पेन ग्रामपंचायत पॅनलचे प्रमुख दत्तराव तहकिक ,उपसरपंच राजू बेदरे , सदस्य बेबीताई साठे , सदस्य राजामती काळदाते.व गावातील प्रतिष्ठीत मांडळी भिकाजी तहकीक ,बळीराम तहकीक,संतोष वानरे ,भगवान वानरे ,लक्ष्मण वाघमारे राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश खिराडे ,रमेश राजगुरू ,सैनिक दीपक पदमाने ,संतोष पंडीत ,दीपक साळवे,पंढरी वानरे,योगेश साठे,मंगेश साठे शामा अंभोरे व इतर गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ सुनिता संजय वानरे यांनी गावातील अपूर्ण राहिलेली कामे आपण तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार व गाव विकासाच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करून पुढील दोन वर्ष जनसेवेची व वैयक्तिक आणि सार्वजनिक कामाकडे कटाक्षाने लक्ष घालून गावातील प्रमुख समस्या सोडणार असल्याचे त्यांनी निवडीवेळी प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे, सौ सुनीता वानरे यांच्या निवडीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले व गावात फटाके फोडून त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला,

Post a Comment

0 Comments