Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक कागलं तालुक्याच्या आत्मसम्मानाची व स्वाभिमानाची निवडणूक ! __ पालकमंत्री ना . मुश्रीफ

 कोल्हापूर लोकसभेची निवडणूक कागलं तालुक्याच्या आत्मसम्मानाची व स्वाभिमानाची निवडणूक ! __ पालकमंत्री ना . मुश्रीफ.

---------------------------------------------------------

मुरगूड/ प्रतिनिधी : जोतीराम कुंभार

----------------------------------------------------------

      भारत शक्तीशाली व सामर्थ्यवान करण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे . त्यामूळे सर्वांनी महायुतीच्या पाठीशी ठाम रहा . कोल्हापूर लोकसभेची निवडणूक वेगळ्या ऐतिहासिक वळणावरची आहेच . त्याशिवाय ही निवडणूक कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे . तालुक्याच्या अस्तित्वाची , स्वाभीमानाची व आत्मसम्मानाची निवडणूक आहे . त्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन पालकमंत्री ना . हसन मुश्रीफ यांनी केली .

         महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुरगूडच्या ऐतिहासिक हुतात्मा तुकाराम चौकात जाहिर सभा झाली .सभेच्या अध्यक्षस्थानी  शामराव घाटगे होते . तर सभेस समरजितसिंह घाटगे , अभिनेता गोविंदा ' आमदार अमोल मेटकरी ' आमदार तानाजीराव मुटकूळे ' गोकूळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील , शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रविणसिंह पाटील ' अविनाश पाटील आदि प्रमुख उपस्थित होते .

             या सभेत बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले ;मोदीजींनी  संविधान वाचविण्याचा प्रयत्न केला . कॉंग्रेसकडूनच संविधान मोडण्याचा व संविधानाचा अवमान  झाला आहे . देशाचे नागरिकत्व डावलणाऱ्या व महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करण्याची ही वेळ आहे .

            आमदार अमोल मेटकरी म्हणाले , जोपर्यंत सूर्य , चंद्र तारे आहेत तोपर्यंत संविधानाला धक्का लागणार नाही कोणीतरी भावनीक करुन मते मागातील त्यांना बळी पडू नका .

        महायुतीचे  उमेदवार संजय  मंडलिक भाषणात म्हणाले ' या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले .देशाला स्थीर शासन दिले .आपल्याला देशाबरोबरच आपला जिल्हा बलशाली करायचा आहे . त्यासाठी छ .शाहूंचा कार्याचा व विचाराचा वारसा आम्ही घेवून या निवडणूकीत उतरलोय .भूमीपूत्राला विजयी करण्यासाठी आपण या सभेद्वारे निर्धार करण्याचे आवाहनही त्यांनी केले .

        अभिनेते गोविंदा यांनी हिंदी व मराठी भाषेत भाषण करीत उमेदवार संजय मंडलिक यांना साथ देण्याचे जनतेला नम्र आवाहन केले . त्यांनी समाजाच्या विकासासाठी महायुतीला दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले .

          यावेळी प्रविण सिंह पाटील , आमदार तानाजीराव मुटकूळे ' रणजितसिंह पाटील , कॉंअशोक चौगले , अॅड . राणा प्रताप सासणे , बबन बाबर ' संकेत भोसले . भगवान पाटील आदींची भाषणे झाली .

         सभेस शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे ;अॅड विरेंद्र मंडलिक बिद्रीचे संचालक सुनिल सुर्यवंशी , प्रवीण भोसले 'दिग्वीजय पाटील ' आर.डी. पाटील , श्री खिलारे ' रणजित सुर्यवंशी ;दगडू शेणवी ' आदि प्रमुख उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक शिवसेना जिल्हा प्रमुख राजेखान जमादार यांनी केले . तर संतोष वंडकर यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments