बारावी बोर्ड परीक्षेत किसन वीर महाविद्यालयाचे घवघवीत यश.

 बारावी बोर्ड परीक्षेत किसन वीर महाविद्यालयाचे घवघवीत यश.

------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे

------------------------

वाई - बारावी बोर्ड परीक्षेत जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ८८.१५ टक्के लागला आहे. यामध्ये विशेष अभिमानाची बाब म्हणजे २२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व १२४ विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेचा निकाल ९६.०० टक्के लागला असून यामध्ये अडसूळ हर्षद गणेश व कु. निकम तनुजा अजय या विद्यार्थ्यांनी ८४.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. पिसाळ देशमुख पियुषा कल्याण या विद्यार्थीनीने ८३.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय व कु. महाडिक श्रेया सुरेश या विद्यार्थीनीने ८२.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

वाणिज्य शाखेचा निकाल ८९.३६ टक्के लागला असून यामध्ये कु. पवार श्रुती विकास या विद्यार्थीनीने ८८.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. सपकाळ रोशनी सुनील या विद्यार्थीनीने ८६.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. भोसले अदिती संतोष या विद्यार्थीनीने ८५.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

कला शाखेचा निकाल ६६.४७ टक्के लागला असून यामध्ये कु. यादव अक्षदा संदीप या विद्यार्थीनीने ८५.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. मेंगडे कृषिका नितीन या विद्यार्थीनीने ७५.५० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. भणसे पूजा सुभाष या विद्यार्थीनीने ७४.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, संचालक मंडळाचे सर्व सदस्य , सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डाॅ. गुरुनाथ फगरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. विवेक सुपेकर, पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब कोकरे, कार्यालय प्रमुख श्री. बाळासाहेब टेमकर, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.